10 ऑक्टोबर 2026 रोजी जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाची थीम आहे, (world mental health Day 2026)
Live experience heard real voice real change म्हणजेच मानसिक समस्याचा प्रत्यक्ष सामना केलेल्या व्यक्तींचे अनुभव ऐकणे आणि त्याद्वारे सकारात्मक बदल घडवणे, असं आहे. जगभरात हा दिवस जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी वाढत्या ताण-तणावाच्या युगात मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे,हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
आजही आपल्या समाजामध्ये शारीरिक आजारावर जितके उघडपणे बोलले जाते,तितके मानसिक आजारावर बोलले जात नाही. मानसोपचार तज्ञांकडे किंवा समुपदेशकाकडे जाणाऱ्या व्यक्तीला आजही समस्येने किंवा वेगळ्या नजरेने पाहिले जाते. हा मानसिक कलंक पुसून टाकणे गरजेचे आहे.
आज एक पेशंटचे अनुभव मांडत आहे. जिया.जियाची आणि माझी भेट आयसीयू मध्ये झाली बेडवर ऑक्सिजन लावलेली,हातामध्ये किटकॅट लावून सलाईन चालू होती. तीन दिवस एमबीएममध्ये म्हणजे उपाशीपोटी असलेली जीया खूप अशक्त हतबल झालेली दिसत होती.
तिच्या नजरेत निरागस, नि:स्वार्थ अशी भावना दिसत होती. किमान पंधरा-सोळा वर्षाची ती सुंदर मुलगी होती. पेपर बघितले,हिस्टरी वाचली माझ्या मनात सहानुभूती निर्माण झाली,खूप प्रश्न,खूप उत्तरे,खूप अपेक्षा निर्माण होत होत्या, साधा कांदा कापताना चुकून चाकूने बोटाला कापले तर झालेल्या वेदना आणि काहीही न करता डोळ्यातून आलेले पाणी हे देखील पाच मिनिटापेक्षा जास्त सहन होत नाही.
ती व्यक्ती विष पिऊन घरात राहते,कोणालाही सांगत नाही, चक्कर येऊन पडता लक्षात आले,मग तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले जाते. आईची अवस्था तर जिवंत प्रेत अशी होती,वडील आणि भाऊ जगण्यासाठी खातो आयुष्य इतकच राहिले आहे, असे त्यांचे वाक्य होते.
नेमकं काय झालं होतं, त्यावर त्यांनी सांगितले, " मुलाशी चॅटिंग करतेस, बोलतेस, भेटतेस ते सर्व आत्ताच थांब नाहीतर आम्हाला हे थांबवावे लागेल" या वाक्यावर सगळे घडले, पण याची सुरुवात ही एक वर्ष झाली होती. गरीब कुटुंबातील दिसायला बरा होता, पण ज्याला समजून घेणारा, ती आनंदी राहावी म्हणून धडपड करणार करणारा, त्याचं हसणं खूप छान वाटत होतं तिला. ती तिच्या मैत्रीला सांगत होती, आज मी तिची समुपदेशक नाही तर एक मैत्रीण होती अशी मैत्रीण जी जीयाला अभिषेक (अभि) वाटत होती.
अभीपासून लांब जाणे म्हणजे मरण यातना वाटत होती, रात्रभर झोप येत नव्हती, जेवणाकडे लक्ष नव्हते, अभ्यासात दहावीला 93 टक्के मार्क पडलेल्या जियाला अभ्यास नको वाटत होता, सतत अंथरुणावर लोळत पडत होती, कोणाशी बोलत नव्हती, नैराश्य ,उदासीन, चेहरा , निरुत्साही , आत्मविश्वास कमी , वजन कमी झाले होते , सतत नकारात्मक विचार येत होते, आई वडिलांना कायम संशयाने बघत होती, नटणे मुरडणं जणू ती विसरूनच गेली होती.
सणसूद याचा तिला भानच राहत नव्हते, हे सगळं असंच चार-पाच महिने झाले. दिवसें-दिवस प्रमाण वाढतच आले होते, सगळे डॉक्टर दाखवले उपचार घेतले पण येरे माझ्या मागल्या नेहमीसारखंच अवस्था निर्माण झाली होती.
एकटे स्वतःला कोंडून ठेवणे, घर सोडून न जाणे असे वाटत होते, दिवसेंदिवस रडत बसणे वाढतच होते, याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होत होता. मानसिक आजाराची सुरुवात झाली होती, शैक्षणिक नुकसान झाले, सामाजिक प्रतिष्ठा बदलली जात होती, हे असे स्पष्ट दिसत होते.
समाजाचा देखील तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता. हा-हा म्हणता बातमी सगळीकडे पसरली. घरच्यांना मुलीच्या भविष्याची काळजी टोचणी देत होती, मन अस्वस्थ वाटत होते, तेव्हा त्यांना समुपदेशकाची मदत मिळाली. मुलीचे व पालकांचे समुपदेशन सेशन होत गेले.
तसं तिच्या व आई-वडिलांच्या मानसिक अवस्था सुधारत होती. शारीरिक स्थिती सुधारली, ती स्वतः एकाग्रतेने अभ्यास करू लागली. आत्मविश्वासाने स्पर्धेमध्ये उतरून यश मिळवत होती, पण समाज भूतकाळातील घटना तिला आठवण करून देत होता. पण तिने ही परिस्थिती स्वीकारली होती, ती इतरांना सांगत होती, मी स्वतःला व स्वतःच्या विचारांना बदलत आहे.
तुमची मला मदत नको, तुमचा दृष्टिकोन बदला, समाज बदले तिला मानसोपचार तज्ञांची मदत मिळाली आज ती स्वतः एक अधिकारी या पदावर काम करते, मला अभिमान वाटतो. स्वतःच्या कामाबद्दल व मला यातून बाहेर येण्यास मदत केलेल्या समुपदेशक व मानसोपचार तज्ञांच्या कामाबद्दल ती सार्थ अभिमान व्यक्त करते.
उदासीनता, नैराश्य, चिंता, तणाव, व्यसनाधीनता हा विचारांचा भाग आहे. तुम्ही जसे विचार कराल तसे तुम्ही वागाल थोडक्यात विचार भावना आणि कृती घडत असते. आकाशात आलेले ढग हे पाऊस पडल्यानंतर निघून जातात, परत ढग स्वच्छ सुंदर दिसते. काळोख निघून जातो, आयुष्यातील काही दुःखद प्रसंग हे असे असतात, पण त्यामुळे आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी चांगलाच असावा.
लेखन : स्नेहा ऋषिकेश पेंडे-जकाते, मानसशास्त्रज्ञ समुपदेशक. लेखिकाचा अल्प परिचय : स्नेहा ऋषिकेश पेंडे-जकाते, मानसशास्त्रज्ञ समुपदेशक. एम ए एन क्लिनिकल सायकॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन रिहॅबिटेशन सायकॉलॉजी, डिप्लोमा इन व्होकेशनल रिहॅबिलिटेशन इन डिसिबिलिटी 2012 पासून क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहे
स्नेहबंध समुपदेशन व व्यसनमुक्ती केंद्र,मिरज सांगली, जयसिंगपूर, मलेवाडी इथं प्रॅक्टिस करत आहे. जे जे मधून कॉलेज ऑफ इंजिनियरींग येथे कॉन्सिलर म्हणून प्रॅक्टिस करत आहे.
मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी सोलापूर,सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व्याख्यानं,चर्चासत्रे,लेख,रेडिओवरील मुलाखत यांच्या अंतर्गत मानसिक आरोग्यावरती कार्य करत आहे. आतापर्यंत वृद्धाश्रम, विशेष मुलांची शाळा, मनोरुग्णालय तसेच मेंदू विकार,हृदयविकार यांच्याकडे उदासीनता,नैराश्य चिंता,तणाव या वरती उपचार आतापर्यंत असलेल्या कामाचा आढावा घेऊन स्त्री सन्मान पुरस्कार,स्त्री प्रतिष्ठा सन्मान पुरस्कार,सामाजिक सेवा पुरस्कार,जिजाऊ पुरस्कार,राज्यभूषण पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
शाळा,महाविद्यालये,आरोग्य केंद्र,सामाजिक उत्सव कार्यक्रमांतर्गत,मनोरुग्णालय अशा ठिकाणी प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे,रेडिओ,वृत्तलेख या अंतर्गत मानसिक आरोग्य जनजागृती करण्याचं कार्य चालू आहे.
