सतत पक्ष बदलणाऱ्या राजकीय नेत्याच भविष्य नसतोच
सोलापूर : सोलापूर शहरातील युवा वर्गाच्या मनात स्थान निर्माण करणारे एमआयएम पक्षाचे माजी शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांचं अस्तित्व संपलं की काय असे चित्र सोलापुरात निर्माण झाले आहे. ऐन महानगरपालिका निवडणूकीत चाहत्यांना धोका देणाऱ्या फारुक शाब्दी यांचं अस्तित्व राहिलंच नाही अशी चर्चा सोलापूर शहरातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुस्लिम स्मशानभूमीला भरघोस निधी मिळावा यासाठी आमरण उपोषणाला बसून स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्या फारुक शाब्दी यांचा केविलवाणा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. 2019 ते 2024 पर्यंत फारुक शाब्दी यांनी कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासने देत आमदार इलेक्शन साठी वापर करून घेतला. ज्यावेळी कार्यकर्त्यांना महानगरपालिका निवडणूक लढवायची होती, त्यावेळी फारुक शाब्दी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत, समर्थकांना जबर धक्का दिला होता. एमआयएम पक्ष सोडल्या नंतर फारुक शाब्दी यांच्या समोर मोठा प्रश्न पडला आहे....? कोणत्या पक्षात जायचे.
मात्र योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे फारुक शाब्दी यांना निर्णय घेणे अवघड झाले आहे. 2014 साली अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नव निर्माण सेना पक्षातून आमदारकीच इलेक्शन लढविणाऱ्या फारुक शाब्दी यांनी 2019 मध्ये एमआयएम पक्षातून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आमदारकीच इलेक्शन लढविले. 2019 साली निसटता पराभव झाल्याने फारुक शाब्दी यांनी एमआयएम समर्थकांना सोबत घेत 2024 मध्ये सोलापूर मध्य मधून निवडणूक लढविली. विधानसभा इलेक्शन नंतर एक वर्षातच सोलापूर महानगरपालिका निवडणुका लागल्या होत्या. पाच वर्षांपासून फारुक शाब्दी यांचा कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या अनेक समर्थकांच्या अपेक्षांवर पाणी पडले. एमआयएम कडून उमेदवारी मिळेल ही आशा घेत कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस एक केलं,मात्र या कार्यकर्त्याच्या हाती निराशा पडली आहे. ऐन निवडणुकीत कार्यकर्त्यांना एकटा सोडणारे फारुक शाब्दी हे एकाकी पडलेत की काय असे चित्र निर्माण झाले आहे. सतत पक्ष बदलणाऱ्या राजकीय नेत्याच कधीच भविष्य नसतो हे यावरून स्पष्ट झालं आहे.
