Ticker

6/recent/ticker-posts

उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी शिक्षक प्रयत्नशील असायला हवे - डॉ चोबदार



सोलापूर उर्दू घरात पुस्तक प्रकाशन, कवी संमेलन व विद्यार्थी संवाद कार्यक्रम संपन्न

सोलापूर : शमा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शमा उर्दू प्रायमरी स्कूलच्या वतीने "शिक्षक दिना"च्या निमित्ताने "सोलापूर उर्दू घर तालीमी सहल", "इमकान" चे प्रकाशन आणि त्रिभाषिक काव्य संमेलनाचा भव्य कार्यक्रम सोलापूर उर्दू घरात, सोलापूर उर्दू भाषा प्रमुख प्रा.डॉ.म.शफी चोबदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

उर्दू भाषाच नव्हे तर प्रत्येक मातृ भाषेच्या संवर्धनासाठी शिक्षिकानीच नेहमी प्रयत्नशील असायला हवे. कारण इथेच लहान विद्यार्थ्याची जडण घडण होत असते. असे मत कार्यक्रमाचे अधयक्ष प्रा डॉ.म.शफी चोबदार यांनी उर्दू घर येथे झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.

या प्रसंगी प्रमुख अतिथी साहिर नदाफ,डॉ.सुमय्या बागबान, अय्यूब अहमद नल्लामंदू,कवी मुबारक शेख,प्रा.नरेंद्र गुंडेली, कवी जावेद शेख,डॉ.सुरय्या परवीन जहागीरदार,जाफर ब्रांगी, मझहर अल्लोळी आदी उपस्थित होते.


सुरुवातीला सचिव अबुबकर नल्लामंदू आणि मुख्याध्यापिका यास्मीन अ.मन्नान बिजापूरे यांनी प्रमुख अतिथी व कवींचा शाल व बुके देऊन सन्मान केला.

त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेने प्रकाशित केलेल्या "इमकानचा जफर गैरखपूरी" विशेषांकाचे प्रकाशन प्रमुख अतिथींच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी शमा उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने सोलापूर उर्दू घर वाचनालयाला सचिव अबुबकर नल्लामंदू यांच्या हस्ते पुस्तके भेट देण्यात आली.



त्यानंतर शमा उर्दू शाळेच्या मुलांनी उर्दू कविता व भाषणे सादर करून सर्वांची मने जिंकली.

त्यानंतर झालेल्या त्रिभाषिक काव्य मैफिलीत तेलुगू कवी नरेंद्र गुंडेली,हिंदी कवी जावेद शेख,मराठी कवी मुबारक शेख, उर्दू कवी अय्यूब अहमद,उर्दू-मराठी कवयित्री डॉ. जहागीरदार,शाहीन सदफ,जाफर बांगी,डॉ.चोबदार यांनी आपल्या रचना सादर करून वाहवा मिळवली.





कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीन सदफ यांनी केले, मुशायऱ्याचे सूत्रसंचालन अय्यूब अहमद यांनी केले तर आभार जुबेदा सैदखाँ यांनी मानले.

उर्दू घरावर विशेष कविता सादर केल्याबद्दल कवयित्री शाहीन सदफ यांचे उर्दू घराचे सदस्य डॉ.शफी चोबदार आणि ग्रंथपाल साहिर नदाफ यांनी विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अबरार अहमद नल्लामंदू, आसिया बिजापूरे, दिलशाद अ.रज्जाक,आफताब अब्दुल कुद्दुस,मेराज अल्लोळी,रेशमां शेख,कौसर शेख यांनी खूप परिश्रम घेतले.