Ticker

6/recent/ticker-posts

लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन


सोलापूर : जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी ऐकून त्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,सात रस्ता,सोलापूर येथे करण्यात आले आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.





या लोकशाही दिनात मागील सहा महिन्यांतील लोकशाही दिनाच्या निवेदनांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल,माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत प्राप्त अर्ज तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलवरील प्रलंबित तक्रारींवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेऊन संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.