पंचायत समितीसह माचणुर व बोराळे येथे भेट
सोलापूर : संकल्प सेवा अभियानात ग्रामस्थांनी चांगल्या सेवा द्या. स्वच्छ स्वच्छता ही सेवा २०२६ अंतर्गत उपक्रम यशस्वीपणे राबवा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान अंतर्गत मंगळवेढा पंचायत समितीस सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ कुशल जैन यांनी भेट दिली. *एक पेड माॅ. के नाम* अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली. मंगळवेढा तालुक्यातील बोराळे व माचणुर येथे वृक्षारोपण करून शाळा व अंगणवाडींना भेट देऊन विद्यार्थ्यांची संवाद साधला. त्यांचे समवेत ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ,गटविकास अधिकारी जास्मिन शेख,इतर अधिकारी व पंचायत अधिकारी उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियान,स्वच्छता ही सेवा २०२६, मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियान,घरकुल,शौचालय,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन,घरपट्टी व पाणी पट्टी वसुली,जी राम जी योजना,शैक्षणिक गुणवत्ता व शाळा खाल्यांची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केली. सेवा संकल्प अभियाना सेवा देणेचे आवाहन केले.
या प्रसंगी घरकुल लाभार्थ्यांचा प्रवेश सिईओ कुशल जैन यांचे प्रमुख उपस्थित करणेत आला. विस्तार अधिकारी प्रकाश शिवशरण,कृषी विस्तार अधिकारी डोरले,ग्रामपंचायत अधिकारी जमीर मुलाणी,ग्रामपंचायत अधिकारी संगीता माने,माचनूर,स्वच्छ भारत मिशनचे एकनाथ जगताप व धर्मराज संखनवरू उपस्थित होते.
