२४ ते २६ ऑगस्टदरम्यान उपक्रम; घरोघरी जाऊन राख्या संकलित करणार-राज्यसभा खासदार डॉ.ज्योतीताई वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन
सोलापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी सुरू केलेल्या *‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’*च्या माध्यमातून राज्यातील कोट्यवधी महिलांना आर्थिक आधार मिळाला. या योजनेमुळे बहिणींच्या संसाराला हातभार लागला असून, भाऊ म्हणून महिलांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश शिंदे यांनी दिला आहे.
याच भावनेतून ‘लाडक्या बहिणीकडून लाडक्या भावाला शिवसेनेची राखी’ हा अनोखा उपक्रम सोलापुरात राबविण्यात येत आहे. रक्षाबंधनाच्या औचित्याने सोलापुरातून तब्बल एक लाख राख्या संकलित करून एकनाथजी शिंदे साहेबांना मुंबई येथे प्रत्यक्ष भेट देऊन सुपूर्द करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
हा उपक्रम दि. २४ ते २६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सोलापूर शहर व परिसरात विविध ठिकाणी राबविण्यात येणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींकडून राख्या संकलित करण्यात येणार आहेत. तसेच विविध ठिकाणी तीन दिवस राखी संकलनासाठी विशेष बॉक्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या संपूर्ण उपक्रमाला राज्यसभा खासदार डॉ. ज्योतीताई वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभणार असून, सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाशभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
‘सर्वसामान्य बहिणीचा सन्मान हाच एकनाथ शिंदे साहेबांचा खरा विचार आहे’, हा संदेश घेऊन प्रकाशभाऊ राठोड व त्यांचे सहकारी या उपक्रमाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत आहेत. राख्या संकलित करण्यासोबतच शिवसेनेची विचारधारा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्याची माहितीही घरोघरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लकी ड्रॉ ठरणार विशेष आकर्षण - या उपक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे संकलित करण्यात आलेल्या राख्यांमधून तीन लाडक्या बहिणींच्या राख्यांची लकी ड्रॉद्वारे निवड करण्यात येणार आहे. या तीन विजेत्या बहिणींना एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आकर्षक भेटवस्तू व विशेष बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
‘लाडकी बहीण योजना ही केवळ एक सरकारी योजना नसून भावाने बहिणीला दिलेला शब्द आहे’, हा विश्वास प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रकाशभाऊ राठोड स्वतः मेहनत घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपक्रमाला लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दरम्यान, सोलापुरातील सर्व लाडक्या बहिणींनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या लाडक्या भावाला एक राखी पाठवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
राखी पाठविण्यासाठी संपर्क
विनोद राठोड : ९८३४०५७५०६
संतोष जाधव : ९६५७४४५०८३
