डॉक्टर,वकील,शिक्षक,व्यापारी,उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
सोलापूर : मुस्लिम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय संयोजक इरफान पीरजादा तसेच डॉ.जाविद अन्सारी,पश्चिम भारत संयोजक हे रविवारी 16 ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर आले असता शहरात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले.
या स्वागत कार्यक्रमास एजाज एम.सय्यद (भाजपा), डॉ. इल्यास (सहाय्यता क्लिनिक), ॲड. जाविद खैरदी,सोलापूर विद्यापीठाचे लीगल ॲडव्हायझर सैफू मानियार, समाजसेवक समीर बडेपीर,KBN School चे सेक्रेटरी साजिद शाह, फैसल उर्दू स्कूलचे हेडमास्टर महेबूब कोथिंबीरे,पणन अधिकारी जाकीर शेख, Appeal Jeam Owner अहमद मुन्ना शेख,समाजसेवक मुन्ना बेलीफ,समाजसेवक फरहान सय्यद,प्रकाश मोरे,श्रीशांत भोसले मराठा सेवा संघ,इम्रान रंगरेज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शहरातील डॉक्टर,ॲडव्होकेट,बिल्डर,व्यापारी, व्यावसायिक,शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
सोलापूर दौऱ्यादरम्यान उपस्थित मान्यवरांनी इरफान पीरजादा व डॉ. जाविद अन्सारी यांच्याशी विविध सामाजिक विषयांवर संवाद साधला. समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे,सामाजिक सलोखा,शिक्षण,युवकांचा विकास तसेच समाजहिताच्या विविध विषयांवर परस्पर चर्चा करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि समाजातील विविध घटकांमध्ये संवाद वाढविण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपक्रमांबाबतही यावेळी विचारविनिमय झाला. सोलापूरमधील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती ही या भेटीचे विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी इरफान पीरजादा आणि डॉ. जाविद अन्सारी यांचे सोलापूरमध्ये स्वागत करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
