जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन संपन्न, 1 प्रलंबित प्रकरणावर सुनावणी
सोलापूर : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 04/03/2013 च्या शासन निर्णयान्वये महिन्यातील तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार आज रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या दालनात पार पडला.
सदर महिला लोकशाही दिनामध्ये मागील एक प्रकरण प्रलंबित होते. त्या प्रकरणावर आज सुनावणी घेण्यात आली.
सदर प्रकरण जिल्हा समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद सोलापूर यांच्याशी निगडित आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून उत्तर प्राप्त न झाल्यामुळे सदरचे प्रकरण प्रलंबित आहे. याबाबत संबंधित विभागाला तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
या जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनास निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील,पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी, पोलीस आयुक्तालयाचे प्रतिनिधी, सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अविनाश मगर हे उपस्थित होते.
महिलांच्या तक्रारी,समस्या आणि न्याय मिळवून देण्यासाठी दर महिन्याला महिला लोकशाही दिन घेण्यात येतो.
