Ticker

6/recent/ticker-posts

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची दखल घ्या; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी - DYFI चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


सोलापूर : भारतीय लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI), सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची केंद्र सरकारने तातडीने दखल घ्यावी,तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी,सोलापूर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,सोनम वांगचुक यांनी शांततामय आणि लोकशाही मार्गाने सुरू केलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकारकडून अद्यापही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आंदोलनाला पाठिंबा आणि नैतिक समर्थन म्हणून DYFI सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने १७ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पुलानजीक २४ तासांचे अन्नत्याग उपोषण करण्यात येणार आहे.

प्रमुख मागण्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची केंद्र सरकारने तातडीने दखल घ्यावी. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर योग्य निर्णय घ्यावा.

DYFI ने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र शासनाकडे या मागण्या तातडीने पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा सन्मान राखत केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.