Ticker

6/recent/ticker-posts

जैन सोशल ग्रुप सेंट्रलकडून गोधन विकास गोशाळेला पत्राशेडची भेट; गोपूजनातून गोसेवेचा संदेश


सोलापूर : विजापूर रोडवरील इंचगिरी मठातील गोधन विकास गोशाळेत जैन सोशल ग्रुप (JSG) सेंट्रलच्या सदस्यांच्या देणगीतून उभारण्यात आलेल्या 23 गोमातांच्या निवाऱ्यासाठीच्या पत्राशेडचे उद्घाटन देणगीदारांच्या हस्ते भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोमातेचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच हिरवा चारा अर्पण करून गोसेवा,गोसंवर्धन आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. गोसेवा ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश उपस्थितांनी दिला.





कार्यक्रमास जैन सोशल ग्रुप सेंट्रलचे संस्थापक केतन शहा, देणगीदार मोहन लोढा,वैशाली कुलकर्णी,पुष्पलता महाराज (इंचगिरी मठ), वरुण कुलकर्णी,डॉ.पारपल्लीवार,राजेश वडी शेरला आणि शुभम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजातील प्रत्येक घटकाने गोसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. अशा सेवाभावी उपक्रमांमुळे गोशाळांना आर्थिक व सामाजिक बळ मिळण्याबरोबरच समाजात करुणा,सेवाभाव आणि पर्यावरणपूरक जीवनमूल्ये अधिक दृढ होतात,असे मत त्यांनी व्यक्त केले.





गोधन विकास गोशाळा व्यवस्थापनाने जैन सोशल ग्रुप सेंट्रलच्या सदस्यांसह सर्व देणगीदारांचे आभार मानले. तसेच अधिकाधिक नागरिक, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी गो-उत्पादने खरेदी करून गोसेवेला हातभार लावावा आणि अशा उपक्रमांना सहकार्य करावे,असे आवाहन केतन शहा यांनी केले.