Ticker

6/recent/ticker-posts

मोहन व्ही.यांनी एनटीपीसी सोलापूरच्या प्रकल्प प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली

सोलापूर : एनटीपीसी सोलापूर येथे मोहन व्ही. यांनी १० जुलै शुक्रवार रोजी प्रकल्प प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. एनटीपीसीमधील सुमारे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी अनुभवाच्या बळावर त्यांनी या नव्या जबाबदारीची सूत्रे हाती घेतली.

रायपूर येथील रवी शंकर विद्यापीठातून मेकॅनिकल अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले मोहन व्ही. यांनी १९९० साली एनटीपीसीमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या सेवाकाळात त्यांनी बाल्को (कोरबा), तालचेर कनिहा,सिपत,सोलापूर आणि खरगोन या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.






ऑपरेशन्स विभागात कार्यरत असताना त्यांनी प्रकल्पांची कार्यक्षमता,विश्वसनीयता आणि उत्कृष्ट संचालन सुनिश्चित करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले. एनटीपीसी सोलापूर येथे रुजू होण्यापूर्वी ते एनटीपीसी खरगोन येथे इंधन व्यवस्थापन तसेच संचालन व देखभाल (O&M) विभागाचे महाव्यवस्थापक आणि प्रकल्प प्रमुख म्हणून कार्यरत होते.




पदभार स्वीकारल्यानंतर महाव्यवस्थापक (संचालन व देखभाल) सुभाषीश बंदोपाध्याय,अतिरिक्त महाव्यवस्थापक (व्यवस्थापन) कन्हैया दास तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन मोहन व्ही. यांचे स्वागत केले. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एनटीपीसी सोलापूर प्रकल्प अधिक प्रगतीपथावर जाईल,असा विश्वास व्यक्त केला.