सोलापूर : आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. श्रीनिवास काटकुर यांनी नागरिकांना शुभेच्छा देत न्याय, शांतता आणि समानतेचा संदेश दिला आहे. न्याय हीच शांतता, प्रगती आणि सुसंवादी समाजाची भक्कम पायाभरणी असल्याचे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून नमूद केले.
"Justice is the foundation of peace and progress. Let us work together for a fairer and better world." या संदेशाद्वारे त्यांनी प्रत्येक नागरिकाने न्यायव्यवस्थेचा सन्मान करत समाजात कायद्याचे राज्य, समान हक्क आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले आहे.
ॲड.श्रीनिवास काटकुर हे विधी क्षेत्रात कार्यरत असून B.Com., G.D.C.&A., M.A., LL.B. अशी शैक्षणिक पात्रता त्यांनी प्राप्त केली आहे. विविध सामाजिक आणि कायदेशीर विषयांवर ते मार्गदर्शन करत असून नागरिकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.
आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त त्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि न्यायप्रेमी संदेशाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत असून,न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येकाने संविधानिक मूल्ये जपण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.
