Ticker

6/recent/ticker-posts

व्वा संघटनेतर्फे १५६ महिलांना मोफत उज्ज्वला गॅस कनेक्शनचे वितरण; सोलापुरात विक्रमी ७८४ कनेक्शनचा कोटा


सोलापूर : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत व्वा (WOW) संघटनेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. या लाभार्थींना एक भरलेला गॅस सिलेंडर, गॅस शेगडी,रेग्युलेटर आणि रबर ट्यूबचे वाटप करण्यात आले.

कुमठा नाका येथील प्रेषक इंडियन गॅस एजन्सीच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात भाजपच्या शहर अध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.

यावेळी नगरसेवक शिवाजीराव वाघमोडे,सात्विक बडवे, दत्तात्रय बडगू,आनंददादा भवर,अर्जुन जाधव,व्यंकटेश कोंडे, नगरसेविका वैदाबानो भंडाले,आश्विनी चव्हाण,नडगिरी, यशोदा सोनवणे,माजी नगरसेविका लताताई फुटाणे,तसेच शिवानंद कावडे,ऋतुजा आंदेली,अफरीन पटेल,किसन गरजे, जगन्नाथ चव्हाण,नवले सर,लक्ष्मण सातपूते,सिद्धेश्वर रूपनर, सी.ए.बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.





कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रेषक इंडियन गॅस एजन्सीच्या प्रवर्तक विद्या लोलगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची माहिती दिली. स्वयंपाक करताना धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार ही योजना राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या योजनेअंतर्गत प्रत्येक गॅस सिलेंडरमागे लाभार्थी महिलांच्या खात्यावर ₹३०० अनुदान (सब्सिडी) जमा होत असल्याची माहिती त्यांनी दिली.




कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार व्यवस्थापक शिवाजी थीटे व कुमार नक्का यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नम्रता जाधव,अर्चना अवर, अबू काझी यांच्यासह अमित कुलकर्णी,अभिजीत राजपूत, किरण राजपूत आणि श्रीपाद परलेकांडा यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी व्वा संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी सांगितले की, यंदा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमार्फत प्रेषक इंडियन गॅस एजन्सीला ७८४ मोफत गॅस कनेक्शनचा कोटा मंजूर झाला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेला हा सर्वाधिक आणि विक्रमी कोटा असल्याचे त्यांनी नमूद केले.