सोलापूर : महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना,सोलापूर शहर यांच्या वतीने पार्क चौक येथील जनसेवा संघटनेच्या कार्यालयात माजी सहकारमंत्री तथा लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह (पप्पासाहेब) शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पप्पासाहेबांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की,त्यांनी आयुष्यभर जनसेवा,सहकार,शिक्षण आणि ग्रामीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. कार्यकर्त्यांवरील त्यांचे अपार प्रेम,सर्वसामान्य जनतेप्रती असलेली आत्मीयता,विकासाची दूरदृष्टी आणि समाजहिताची तळमळ आजही असंख्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थितांनी "नेते अनेक झाले,पण कार्यकर्त्यांच्या मनात घर करणारा असा नेता पुन्हा होणे नाही...!" या शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत पप्पासाहेबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
या अभिवादन कार्यक्रमास शिरीष जगदाळे,सतीश वावरे,ज्योतिबा गुंड,शिवराज विभुते,अजय सोमदळे,दिलीप भोसले,श्रेयस माने,सचिन मस्के,दिलीप निंबाळकर,नाना कामाने,साळुंखे,सचिन थोरात तसेच पप्पासाहेबांचे अनेक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना,सोलापूर शहरचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
