Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा लोकशाही दिनात 42 तक्रार अर्ज प्राप्त...


जिल्हा लोकशाही दिनात 42 तक्रार अर्ज प्राप्त ; विहित वेळेत निपटारा करण्याचे महसूल उपजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दि. 6 जुलै 2026 रोजी झालेल्या जिल्हा लोकशाही दिनात विविध विभागांशी संबंधित एकूण ४२ तक्रार अर्ज व निवेदने प्राप्त झाली. उपजिल्हाधिकारी महसूल लक्ष्मण कसेकर यांनी स्वतः नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व सर्व संबंधित विभागप्रमुखांना प्राप्त तक्रारींचा विहित मुदतीत निपटारा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

विभागनिहाय प्राप्त अर्जांची संख्या - लोकशाही दिनात जिल्हा परिषद सोलापूर - 9, भूमी अभिलेख - 3, पोलीस आयुक्त सोलापूर शहर - 5, अपर चिटणीस - 1, तहसील पंढरपूर -1, महावितरण - 2, पोलीस ग्रामीण - 2, जिल्हा उद्योग केंद्र - 1, जिल्हा अग्रणी बँक - 2, कार्यकारी अभियंता उजनी प्रकल्प - 1, तहसील दक्षिण सोलापूर - 1, जिल्हा पुरवठा कार्यालय - 1, तहसील माळशिरस - 1, जिल्हा उपनिबंधक - 1, जिल्हा पुनर्वसन कार्यालय - 1, भूसंपादन समन्वय - 2, आस्थापना शाखा - 3, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग - व इतर विभाग - असे एकूण 42 अर्ज प्राप्त झाले.

यावेळी उपजिल्हाधिकारी कसेकर म्हणाले, “लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांना प्रशासनासमोर थेट आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळते. प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागाने विहित कालमर्यादेत कार्यवाही करावी व अर्जदाराला केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी.”

बैठकीस तहसीलदार दंडीले यांच्यासह जिल्हा परिषद,पोलीस,महावितरण,महसूल,भूमी अभिलेख,जिल्हा उद्योग केंद्र,अग्रणी बँक,पुरवठा,पुनर्वसन,भूसंपादन, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.