Ticker

6/recent/ticker-posts

"मुंबईत मुसळधार पाऊस; तरीही अधिवेशनासाठी आमदार देवेंद्र कोठे मुंबईकडे रवाना, सुट्टीच्या दिवशीही नागरिकांच्या समस्या ऐकल्या"



सोलापूर : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे रवाना होण्यापूर्वी शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सुट्टीच्या दिवशीही जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या व मागण्या जाणून घेत संबंधित विभागांशी संपर्क साधत आवश्यक त्या ठिकाणी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानंतर आमदार देवेंद्र कोठे हे पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रस्तेमार्गे मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असतानाही जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विधानसभा अधिवेशनात प्रभावीपणे सहभाग नोंदविण्यासाठी त्यांनी प्रवास सुरू ठेवला.





यावेळी त्यांनी, "जनतेचा विश्वास आणि सोलापूरच्या विकासाचा ध्यास हेच माझ्या कामाचे बळ आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार," अशी भूमिका व्यक्त केली.

आमदार देवेंद्र कोठे यांच्या या दौऱ्यामुळे मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामे आणि लोकहिताच्या मुद्द्यांसाठी ते कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.