Ticker

6/recent/ticker-posts

फेसबुक पोस्टद्वारे सुहास कदम यांचे सायरा शेख यांच्यावर गंभीर आरोप; व्याज व्यवहार, खोटी तक्रार आणि पोलिसांशी संगनमताचा दावा


सोलापूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष सुहास कदम यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर करत सायरा शेख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पोस्टमध्ये कदम यांनी दावा केला आहे की,सायरा शेख यांनी त्यांना 5 टक्के व्याजाने पैसे दिले होते. तसेच, दोन-तीन दिवस व्याज देण्यास उशीर झाला तरी 500 ते 1000 रुपये दंड आकारला जात होता. त्यांनी 2024 पासून नियमितपणे व्याज आणि मुद्दल परत केल्याचा तसेच त्याबाबत फोनपे व्यवहारांचे पुरावे स्वतःकडे असल्याचा दावाही केला आहे.





याशिवाय,सायरा शेख या पोलिसांच्या सांगण्यावरून खोटे आरोप करत असून,आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये सायरा शेख यांच्या राजकीय ओळखीबाबतही भाष्य केले असून,अजित पवार यांच्याशी त्यांची ओळख आपण करून दिल्याचा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

या फेसबुक पोस्टमध्ये पोलिसांवरही अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली असून,काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या "स्क्रिप्ट"नुसार सायरा शेख वागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.