Ticker

6/recent/ticker-posts

इंधन संवर्धन व खाद्यतेल बचतीबाबत महिलांमध्ये जनजागृती


भाजपा महिला मोर्चाच्या वतीने साखर पेठेत अभियानाचे आयोजन

सोलापूर : साखर पेठ येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने ‘इंधन संवर्धन व खाद्यतेल बचत जनजागृती अभियान’ उत्साहात आयोजित करण्यात आले होते. या अभियानांतर्गत महिलांना घरगुती गॅसचा सुरक्षित व योग्य वापर,इंधन बचतीचे विविध उपाय तसेच खाद्यतेलाचा माफक आणि आरोग्यदायी वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात दैनंदिन जीवनात इंधनाची बचत करण्याचे महत्त्व,वाढत्या ऊर्जा गरजांच्या पार्श्वभूमीवर संसाधनांचे संवर्धन तसेच आरोग्यदायी जीवनशैलीसाठी खाद्यतेलाचा संतुलित वापर करण्याची आवश्यकता यावर विशेष भर देण्यात आले.



यावेळी भाजपा शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, रंजिताताई चाकोते,स्त्री आरोग्य सेंटरच्या संयोजिका कुसुमताई मोरे, शहर उपाध्यक्षा इंदिराताई कुडक्याल,शोभा तोरंगी,रूपा कुताटे तसेच अभियानाच्या सहसंयोजिका माधवी आंदे उपस्थित होत्या.

उपस्थित महिलांनी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत इंधन व खाद्यतेल बचतीच्या संदेशाचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये ऊर्जा संवर्धन आणि आरोग्यविषयक जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.