सोलापूर : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी वृक्षारोपण उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि पर्यावरणासमोरील विविध आव्हाने लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज बनली असून,पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणासाठी आपली बांधिलकी व्यक्त केली. तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. हरित, स्वच्छ आणि सुंदर परिसर निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे जतन करण्याचा संकल्प या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच अधिकाधिक वृक्ष लागवडीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले. उपस्थितांनी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगत वृक्षसंवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी भाजपा सोलापूर शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर,उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर,सोलापूर महानगरपालिका सभागृह नेते नरेंद्र काळे,भाजपा सोलापूर शहर सरचिटणीस सुधा अल्लीमोरे,भाजपा क्रीडा प्रकोष्ठ सोलापूर संयोजक यशवंत पाथरूट यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
