Ticker

6/recent/ticker-posts

'मन की बात'च्या प्रेरणेतून जुना संतोष नगरमध्ये वृक्षारोपण; नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या


सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमातून प्रेरणा घेत जुना संतोष नगर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.





यावेळी बोलताना नरेंद्र काळे यांनी सांगितले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच देशहित,पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यावर भर देतात. त्याच प्रेरणेतून जुना संतोष नगर येथे वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनासाठी एक छोटेसे पाऊल उचलण्यात आले. ते म्हणाले की,पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ औपचारिकता नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.



वृक्षारोपण कार्यक्रमानंतर नरेंद्र काळे यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी, तक्रारी आणि विविध नागरी समस्यांची माहिती घेतली. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांच्या तातडीने निवारणासाठी संबंधित अधिकारी व विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.