Ticker

6/recent/ticker-posts

"पत्रकारांचा स्वाभिमान की राजकीय दबाव? संजय दिना पाटील प्रकरणानंतर पत्रकार संघटना बहिष्काराची भूमिका घेणार का?"


मुंबई : पत्रकारांशी अर्वाच्य भाषेत बोलणे, शिवीगाळ वा धमकी देणे, अशा घटनांबाबत पत्रकार संघटना नेहमीच तीव्र भूमिका घेत असल्याचा दावा केला जातो. मात्र, अशा घटनांमध्ये संबंधित राजकीय नेत्यांविरोधात प्रत्यक्ष कृती कितपत होते, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडून शिंदे शिवसेनेत प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी कथितरित्या अर्वाच्य भाषा वापरल्याचा आणि धमकी दिल्याचा व्हिडिओ 25, जून रोजी विविध माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पत्रकारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.


पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या आमदार, खासदार किंवा मंत्र्यांच्या पत्रकार परिषदांवर, कार्यक्रमांवर किंवा मेजवान्यांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका पत्रकार संघटना घेणार का ? असा सवाल जन माणसांत बोलला जातोय. या पार्श्वभूमीवर पत्रकार आणि पत्रकार संघटनांसमोर हाही महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे.





पत्रकारांवरील दबाव, धमक्या आणि अपमानास्पद वर्तनाच्या घटनांवर केवळ निषेध व्यक्त होण्यापेक्षा ठोस कृतीशीलता असणे गरजेचे असल्याची भावना पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे. 

पत्रकार संघटनांनी पक्षभेद न करता पत्रकारांचा सन्मान राखण्यासाठी एकसमान भूमिका घेतल्यास त्यांची निष्पक्षता आणि विश्वासार्हता अधिक बळकट होईल, अशी चर्चा सुरू आहे.