मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, २२ जूनपासून मुंबईतील विधान भवन येथे सुरू होत असून ते १० जुलैपर्यंत चालणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
राज्यातील शेतकरी प्रश्न,कर्जमाफी,अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान,ओबीसी आरक्षण,बेरोजगारी,कायदा-सुव्यवस्था, पायाभूत सुविधा,महागाई तसेच विविध विकासकामांचा मुद्दा या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती आखत असताना सत्ताधारी पक्षही आपल्या योजनांची आणि कामगिरीची माहिती सभागृहात मांडणार आहेत.
यंदाचे पावसाळी अधिवेशन अनेक राजकीय घडामोडींमुळे विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा,महत्त्वाची विधेयके आणि जनहिताच्या विषयांवर सरकारची भूमिका याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान,अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवन परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून विविध संघटना आणि आंदोलक गटांकडून आपल्या मागण्यांसाठी मोर्चे व निदर्शने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी तीन आठवडे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू मुंबईतील विधान भवन राहणार आहे.
"मुंबईच्या विधान भवनात उद्यापासून पावसाळी अधिवेशनाचा बिगुल वाजणार असून सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय सामना रंगण्याची चिन्हे आहेत. शेतकरी,आरक्षण,महागाई आणि विकासकामांसह अनेक ज्वलंत प्रश्नांवर सभागृह दणाणून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे."
