सोलापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी ३० जून २०२६ पर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ई-केवायसी पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांनाच योजनेचा पुढील हप्ता मिळणार असून, ही प्रक्रिया न केल्यास लाभार्थ्यांचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. मात्र लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.
प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले असून,पीएम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी त्यांनी ३० जूनपूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी. ही प्रक्रिया पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर,मोबाईल अॅपद्वारे किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन करता येणार आहे.
ई-केवायसी न केल्यास संबंधित शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते तसेच पुढील आर्थिक हप्ता मिळण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाचे : १)ई-केवायसीची अंतिम मुदत : ३० जून २०२६ लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य. २) ई-केवायसी न केल्यास पीएम किसानचा हप्ता बंद होण्याची शक्यता. ३) प्रक्रिया पीएम किसान पोर्टल,मोबाईल अॅप किंवा CSC केंद्रात उपलब्ध.
