सोलापूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा नेते, युवासेना प्रमुख,माजी मंत्री व विद्यमान आमदार Aditya Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात विविध सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम शिवसेना उपनेत्या Asmita Gaikwad यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेचे पूजन,शिवसेनाप्रमुख Bal Thackeray तसेच स्वर्गीय मासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी अधिकमासानिमित्त उपस्थित सुवासिनींची ओटी भरून त्यांचा सन्मान करण्यात आला.
कर्णिक नगर येथील जागृत शनैश्वर देवस्थान येथे शनैश्वराची महारती करण्यात आली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील संकटे दूर व्हावीत,पावसाला लवकर सुरुवात व्हावी आणि आदित्य ठाकरे यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे,अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शनि भक्तांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून वृक्षांचे वाटप करण्यात आले. तसेच अन्नदानाचा उपक्रम राबवून शनि भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास विष्णू कारमपूरी,दत्ता माने,ॲड.सुरेश (बापू) गायकवाड,योगीराज चिवडशेट्टी,उपजिल्हा संघटिका शशिकला चिवडशेट्टी,उपशहर संघटिका मीना सुर्वे,रेखा सरवदे,अनिता पाटील,जयश्री पाटील,संतोषी भोळे,पूजा शिंदे, चंद्राराणी जाधव,नांगरणी भंडारी,सुनिता अंबलगी,लक्ष्मी माशाळ,डॉ.गौरी गायकवाड यांच्यासह महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी,धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आले.
