Ticker

6/recent/ticker-posts

अक्कलकोट तालुक्यातील एकूण 76 ग्रामपंचायतीचा आरक्षण सोडत कार्यक्रम 9 ते 12 जून या कालावधीत काढण्यात येणार


सोलापूर : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पत्र दिनांक 26 मे 2026 यांनी राज्यातील सन 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या व 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मीत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार विशेष ग्रामसभा बोलावून,तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत दिनांक 9 जून 2026 ते  12 जून 2026 या कालावधीत काढावयाची आहे.

सदर कार्यक्रमानुसार अक्कलकोट तालुक्यातील एकूण 76 ग्रामपंचायतीचा आरक्षण सोडत कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. आरक्षण सोडतीसाठी नेमून दिलेल्या ग्रामपंचायतीचे नांव तेथील अधिकारी व कर्मचारी यांचे नाव व पदनाम व विशेष ग्रामसभा बोलावून आरक्षण सोडत काढावयाची तारीख व वेळ पुढीलप्रमाणे.


मंडळ अधिकारी अक्कलकोट जबेर नदाफ – दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता मातनहळ्ळी व दुपारी 2 वाजता नागनहळ्ळी, दिनांक 10 जून 2026 रोजी  सकाळी 10 वाजता उमरगे व दुपारी 2 वाजता निमगांव, दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता गळोरगी व दुपारी 2 वाजता गौडगांव खु, दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता बासलेगांव व दुपारी 2 वाजता समर्थनगर.

मंडळ अधिकारी वागदरी भासगी आर.एस. – दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता वागदरी व दुपारी 2 वाजता साफळे, दिनांक 10 जून 2026 रोजी  सकाळी 10 वाजता खैराट व दुपारी 2 वाजता भुरीकवठे, दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता गोगांव व दुपारी 2 वाजता बादोले बु, दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता सांगवी बु / हिंगणी / कोळेकरवाडी व दुपारी 2 वाजता सांगवी खु/ममदाबाद/कोळीबोट.


सहायक महसूल अधिकारी  एस एन धर्मसाले – दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता शिरसी/ काळेगांव/बादोले खु.

मंडळ अधिकारी वागदरी विठ्ठल मेकाले - दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता चपळगांव / बावकरवाडी व दुपारी 2 वाजता हन्नूर, दिनांक 10 जून 2026 रोजी  सकाळी 10 वाजता बऱ्हाणपूर व दुपारी 2 वाजता हालहळळी अ, दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता डोंबरजवळगे / अकतनाळ व दुपारी 2 वाजता पितापूर,दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता चपळगांववाडी.



मंडळ अधिकारी मैंदर्गी एस.आय. शेख– दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता तोरणी व दुपारी 2 वाजता भोसगे, दिनांक 10 जून 2026 रोजी  सकाळी 10 वाजता बणजगोळ व दुपारी 2 वाजता संगोगी आ, दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिरजगी व दुपारी 2 वाजता चिक्केहळ्ळी,दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता सातनदुधनी व दुपारी 2 वाजता कल्लापवाडी.

मंडळ अधिकारी दूधनी प्रदीप जाधव – दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता इब्राहिमपूर व दुपारी 2 वाजता मुगळी, दिनांक 10 जून 2026 रोजी  सकाळी 10 वाजता बोरोटी खु.व दुपारी 2 वाजता चिंचोळी मै,दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता बबलाद व दुपारी 2 वाजता सिन्नूर,दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता बोरोटी बु व दुपारी 2 वाजता नागोरे.

 मंडळ अधिकारी जेऊर रमाकांत भासगी – दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता ब्यागेहळ्ळी व दुपारी दोडयाळ,दिनांक 10 जून 2026 रोजी  सकाळी 10 वाजता गौडगांव बु व दुपारी 2 वाजता जेऊर,दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता कर्जाळ.



मंडळ अधिकारी नागणसूर महादेव स्वामी – दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता तोळणूर व दुपारी 2 वाजता हैद्रा,दिनांक 10 जून 2026 रोजी  सकाळी 10 वाजता मराठवाडी व दुपारी 2 वाजता नागणसूर, दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता गुरववाडी व दुपारी 2 वाजता उडगी.

मंडळ अधिकारी तडवळ चारूदत्त काकडे - दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता तडवळ व दुपारी 2 वाजता गुड्डेवाडी,दिनांक 10 जून 2026 रोजी  सकाळी 10 वाजता चिंचोळी नं व दुपारी 2 वाजता आळगे,दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता कोर्सेगांव व दुपारी 2 वाजता कुमठे,दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता मुंढेवाडी व दुपारी 2 वाजता शेगांव.


मंडळ अधिकारी करजगी मल्लीनाथ सुतार - दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुलेरजवळगे व दुपारी 2 वाजता कल्लहिप्परगे,दिनांक 10 जून 2026 रोजी  सकाळी 10 वाजता आंदेवाडी बु, व दुपारी 2 वाजता आंदेवाडी खु,दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता देविकवठे व दुपारी 2 वाजता हंद्राळ,दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता हिळ्ळी.

मंडळ अधिकारी किणी रामकुमार कोळी - दिनांक 9 जून  रोजी सकाळी 10 वाजता किणी व दुपारी 2 वाजता काझीकणबस,दिनांक 10 जून 2026 रोजी  सकाळी 10 वाजता किणीवाडी व दुपारी 2 वाजता कुरनूर,दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता मोटयाळ व दुपारी 2 वाजता सिंदखेड,दिनांक 12 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता किरनळ्ळी व दुपारी 2 वाजता गांव चुंगी.अशी माहिती तहसिलदार अक्कलकोट विनायक मगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.