कुंभारी येथील कॉ.प्रभाकर गेंट्याल यांचे निधन
सोलापूर (निधन वार्ता ) : कुंभारी येथील कॉ.गोदूताई परुळेकर वसाहतीतील रहिवासी तथा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि डी.वाय.एफ.आय.चे जिल्हा समिती सदस्य कॉ.प्रभाकर शिवराम गेंट्याल यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते माजी आमदार नरसय्या आडम यांचे भाचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले आणि आई असा परिवार आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कॉ. गेंट्याल यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या,मंगळवार दि.०९ जून रोजी सकाळी १० वाजता शांती चौक येथील पद्मशाली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
