Ticker

6/recent/ticker-posts

“एक मताने पडले सरकार… अटलजींचा इशारा आज ठरत आहे वास्तव!”


नवी दिल्ली : (सैफन शेख)  १९९९ साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार अवघ्या एका मताने कोसळले,तेव्हा राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. विरोधकांनी या पराभवावर टीका करत हशा उडवला, मात्र अटलजींनी त्यावेळी दिलेला इशारा आजही तितकाच गाजत आहे.

“आज आमचं सरकार एका मताने पडलं आहे. काँग्रेस आमच्यावर हसत आहे,पण माझे शब्द विसरू नयेत… एक दिवस असा येईल,जेव्हा संपूर्ण भारतात आमचं सरकार असेल आणि देश काँग्रेसवर हसेल,” असे ठाम शब्द अटलजींनी उच्चारले होते.

आज जवळपास २७ वर्षांनंतर देशाच्या राजकारणात मोठे बदल दिसून येत आहेत. २८ राज्यांपैकी अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता स्थापन झाली असून,विविध निवडणुकांमध्ये पक्षाला सातत्याने यश मिळत आहे. पश्चिम बंगाल,पुडुचेरी आणि आसामसारख्या राज्यांतील अलीकडील निकालांनी मतदारांचा वाढता विश्वास अधोरेखित केला आहे.



या यशामागे कार्यकर्त्यांची मेहनत,संघटनाची ताकद आणि अटलजींनी दिलेले नेतृत्व आजही प्रेरणादायी ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आजही अटलजींच्या विचारांचा प्रभाव जाणवतो, हीच भाजपाची खरी ताकद मानली जात आहे.

१९९९ मध्ये एका मताने पडलेले सरकार आणि आजची वाढती राजकीय ताकद—या प्रवासातून अटलजींच्या दूरदृष्टीची प्रचिती येत असल्याचे स्पष्ट होत आहे.