Ticker

6/recent/ticker-posts

“वाचू संविधान १२ तास” स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न



सोलापूर : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “वाचू संविधान १२ तास” या अभिनव अध्ययन अभियान व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी उत्साहात पार पडला. डॉ.वै.स्मृ.शा.वैद्यकीय महाविद्यालय व महाकारूणिक एज्युकेशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दि.१६ एप्रिल २०२६ रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत ही स्पर्धा पार पडली होती. स्पर्धेत ९ ते ६९ वयोगटातील तब्बल १०१ स्पर्धकांनी सहभाग घेतला. भारतीय संविधानातील कलम १ ते २०० या अभ्यासक्रमावर आधारित बहुपर्यायी परीक्षा घेण्यात आली होती.



पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयाच्या एसी हॉलमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ.ऋत्विक जयकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक धर्मादाय आयुक्त संजय पाईकराव तसेच उपाधिष्ठाता डॉ.चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते. ॲड.रवी गजधाने यांच्या बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले.

स्पर्धेतील महिला व पुरुष गटातील विजेत्यांना प्रथम,द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्मृतिचिन्ह,पदक,प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्कारांचे स्वरूप होते. प्रथम क्रमांकासाठी रु. १० हजार, द्वितीय रु. ५ हजार, तृतीय रु. ३ हजार तर उत्तेजनार्थ रु. १ हजारांचे पारितोषिक देण्यात आले.

महिला गटातील विजेते
प्रथम – प्रिती सुर्यवंशी (९० गुण),
द्वितीय – सरस्वती कांबळे (८६ गुण),
तृतीय – श्रद्धा माने (८४ गुण).

उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांमध्ये श्रावणी कांबळे,तत्वता ढोबळे,विद्या पवार,वल्लभी सोनवले आणि वैष्णवी चाबुकस्वार यांचा समावेश होता.

पुरुष गटातील विजेते
प्रथम – प्रणव म्हेत्रे (९४ गुण),
द्वितीय – समर्थ सोमवंशी (९० गुण),
तृतीय – शुभम गवळी (९० गुण).
उत्तेजनार्थ पारितोषिक विनय सर्वगोड,डॉ.विवेक जैन, अश्विनीकुमार साबळे,महेश रासे आणि डॉ.शुभम मोहिते यांनी मिळविले.



याशिवाय १५ वर्षांखालील व ६० वर्षांवरील स्पर्धकांचा विशेष सन्मान करण्यात आला. आनंद बनसोडे,स्वराली पौळ, विरासत थोरे,मुग्धा आखाडे,अद्वैत डावरे,डॉ.मीना गायकवाड, डॉ.देविदास गायकवाड,कमल थोरे,मीनाक्षी कर्णेकर आणि सुरेखा साबळे यांना पदक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच सहभागी स्पर्धकांनी निराश न होता पुढील वर्षी अधिक तयारीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.औदुंबर मस्के यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदा काटे,अमोल वाघमारे, राजरत्न फडतरे,अशोक मस्के,आतुर काटे,डॉ.गजानन जत्ती, डॉ.प्रशांत शिरुरे,डॉ.आकांक्षा डांगे,डॉ.अंकुरसिंग गुणावत,डॉ. विशाल अंभोरे,आनंद शिंदे आणि विशाल इरागंटी यांनी परिश्रम घेतले.