सोलापूरमध्ये 1 ते 7 मे पर्यंत 20 हजार 165 स्वयं गणना करण्यात आल्या
सोलापूर : सोलापूर जिल्हा संपूर्ण भारतात 1 मे 2026 पासून स्व गणना करण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःची डिजिटल गणना यशस्वीरित्या पूर्ण केली. व जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी 15 मे 2026 पर्यंत दिलेल्या https://se.census.gov.in या संकेतस्थळावर स्वतःची माहिती भरून स्व जनगणनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात डिजिटल जनगणना 2027 अंतर्गत स्वयं गणनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, जिल्ह्यातील पूर्णतेचे प्रमाण तब्बल 79.82 टक्के इतके झाले आहे. 7 मे 2026 रोजी च्या अहवालानुसार, सोलापूरमध्ये एकूण 20,165 स्वयं गणना प्रक्रिया सुरू करण्यात आल्या असून त्यापैकी 16096 गणना यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिक डिजिटल माध्यमातून स्वतःची माहिती नोंदवून शासनाच्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देत आहेत.
