Ticker

6/recent/ticker-posts

पश्चिम महाराष्ट्र विभाग सह संयोजकपदी विक्रम देशमुख यांची नियुक्ती


सोलापूर : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या संघटन कार्यविस्ताराच्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र विभाग सह संयोजक पदी सोलापूरचे ज्येष्ठ नेते विक्रम देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष संघटन अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.



विक्रम देशमुख यांनी अनेक वर्षे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. कार्यकर्त्यांशी असलेला जवळचा संपर्क,संघटन कौशल्य आणि राजकीय अनुभव यांच्या जोरावर त्यांनी पक्षात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.