Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण मुलींच्या सक्षमीकरणासाठी एनटीपीसी सोलापूरचा पुढाकार; ‘GEM-2026’चा भव्य शुभारंभ


सोलापूर : NTPC Limited च्या सोलापूर प्रकल्पात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘गर्ल एम्पॉवरमेंट मिशन (GEM)-2026’ या उपक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या वंचित मुलींच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत यंदा सुमारे ५० मुलींची निवड करण्यात आली आहे.

एक महिन्याच्या निवासी कार्यशाळेचे उद्घाटन १० मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी सहभागी मुलींना कार्यक्रमातील विविध उपक्रम,प्रशिक्षण आणि उपलब्धींची माहिती देण्यासाठी ‘GEM’ या कार्यक्रमावर आधारित प्रेरणादायी चित्रपट दाखविण्यात आला.



या कार्यक्रमाला बी.जे.सी.शास्त्री,कार्यकारी संचालक (एनटीपीसी सोलापूर), एम.के.बेबी,मुख्य महाव्यवस्थापक (संचालन व देखभाल), सुभाषिस बंदोपाध्याय, महाव्यवस्थापक (देखभाल व अतिरिक्त प्रशासन विभाग), पद्मा शास्त्री,अध्यक्षा सृजना महिला मंडळ,सिबी बेबी, उपाध्यक्षा सृजना महिला मंडळ यांच्यासह एनटीपीसीचे वरिष्ठ अधिकारी व सृजना महिला मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना बी.जे.सी.शास्त्री यांनी मुलींचे शिक्षण,व्यक्तिमत्त्व विकास आणि कौशल्यवृद्धी हा समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया असल्याचे सांगितले. ‘GEM’ सारखे उपक्रम मुलींमध्ये आत्मविश्वास,नेतृत्वगुण आणि नाविन्यपूर्ण विचार विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.



कार्यक्रमादरम्यान यापूर्वी ‘GEM’मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी आपले अनुभव कथन केले. या मोहिमेमुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि विचारांमध्ये सकारात्मक बदल घडल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांमुळे नव्याने सहभागी झालेल्या मुलींमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी मुलींना किटचे वितरण करण्यात आले. यामुळे ‘GEM-2026’ अंतर्गत त्यांच्या शिक्षण आणि विकासाच्या नव्या प्रवासाची औपचारिक सुरुवात झाली.

दरवर्षी आयोजित करण्यात येणारा हा उपक्रम मुलींचे शिक्षण,महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासासाठी एनटीपीसी सोलापूरची असलेली बांधिलकी अधोरेखित करतो.