अक्कलकोट : शेर-ए-हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या शहीद दिनानिमित्त टिपू सुलतान सोशल फाउंडेशन, अक्कलकोट यांच्या वतीने खतना कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अक्कलकोट शहर व तालुक्यातील एकूण ४० मुलांची यशस्वी खतना करण्यात आली.
सामान्यतः खतना प्रक्रियेसाठी गोळ्या,औषधे व ड्रेसिंगसह सुमारे २५०० ते ३००० रुपये खर्च येतो. ही बाब लक्षात घेऊन फाउंडेशनने हा मोफत कॅम्प आयोजित केल्यामुळे अनेक कुटुंबांचा आर्थिक भार हलका झाला.
या सामाजिक उपक्रमाला अक्कलकोट शहरातील नगरसेवक व बांधकाम सभापती सद्दाम शेरीकर,नगरसेवक नंदू कोरबू, नगरसेवक नावेद डांगे तसेच सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास,रशीद खिस्तके,सैपन हगलदिवटे आदींनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले व आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
मागील दोन-तीन वर्षांपासून फाउंडेशनतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून,या उपक्रमांबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या शिबिरासाठी सोलापूरचे प्रसिद्ध डॉ. नासीर सय्यद,मोबीन शेख आणि अल्लाउद्दीन कुरेशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
खतना कॅम्पचे आयोजन संस्थापक अध्यक्ष सैपन शेख व उपाध्यक्ष बाबा गोलंदाज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी म.जी.शेख,आसिफ पटेल,कलाम खान, साहिल शेख,बबलू शेख तसेच फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी दिली.
