Ticker

6/recent/ticker-posts

नसरापूर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा विजय उत्सव साधेपणाने; मृतांना श्रद्धांजली


सोलापूर : नसरापूर येथे झालेल्या निष्पाप बालिकेच्या हत्येच्या घटनेने आणि सोलापूर शहर-जिल्ह्यात विविध घटनांमध्ये झालेल्या खुनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने सोमवारी पश्चिम बंगाल, आसामसह विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या यशाचा आनंद अत्यंत साधेपणाने साजरा केला.

भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर शहर कार्यालयासमोर भाजपाचा ध्वज फडकावून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी “भारतमाता की जय”, “वंदे मातरम”, “जय श्रीराम”, “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो” अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर म्हणाल्या की, पश्चिम बंगालची जनता संकटाच्या कचाट्यातून सुटली आहे. भाजपाचा विजय म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली ठरणार असून संपूर्ण देशात भाजपाची सत्ता यावी हे त्यांचे स्वप्न साकार करण्याकडे पक्षाची वाटचाल सुरू आहे. नसरापूर येथील निष्पाप बालिकेच्या हत्येची तसेच शहर-जिल्ह्यात झालेल्या सहा हत्यांच्या घटनांची जाणीव ठेवून भाजपाने ढोल-ताशे, मिठाई यांचा वापर टाळत केवळ एकमेकांना अभिनंदन करून साध्या पद्धतीने आनंद साजरा केला.

या प्रसंगी शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, रामचंद्र जन्नू, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजयुमो शहराध्यक्ष विजय कुलथे, सरचिटणीस डॉ. शिवराज सरतापे, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, महेश देवकर, शहर चिटणीस रवी भवानी, बजरंग कुलकर्णी, नगरसेविका कल्पना कदम, नगरसेवक प्रशांत पल्ली, विजय चिप्पा, राजकुमार पाटील, भरतसिंग बडूरवाले, बिज्जू प्रधाने, समाधान आवळे, सात्विक बडवे, रवी कैय्यावाले, ऋषिकेश मेट्रे, मेघनाथ येमुल, नागनाथ कासलोलकर, संगीता जाधव, श्रीदेवी फुलारे, मंदाकिनी तोडकरी, विजया वड्डेपल्ली, दीपिका यलदंडी, सत्यनारायण गुर्रम, गौतम कसबे, रुद्रेश बोरामणी, जाकीर सगरी, शिरीष गायकवाड, विजय महिंद्रकर, राजश्री दोडमणी, श्वेता खरात, मृण्मयी गवळी, बसवराज केंगनाळकर, जकप्पा कांबळे, कविता गज्जम, सतीश महाले, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष राजू हिबारे, अल्पसंख्यांक महामंत्री आदम शेख, व्यापारी आघाडी अध्यक्ष लक्ष्मीकांत खंडेलवाल, विश्वनाथ प्याटी, विजय धोत्रे, ओंकार होमकर आदी उपस्थित होते.

मृतांना श्रद्धांजली - यावेळी नसरापूर येथील निष्पाप बालिकेसह शहर-जिल्ह्यातील खूनप्रकरणातील मृतांना एक मिनिट मौन पाळून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.