नवी दिल्ली : देशातील अल्पसंख्याक समुदायांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रातील मोदी सरकार सातत्याने कार्यरत असून त्यांच्या कल्याणासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे,अशी माहिती भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी दिली. ते म्हणाले की, २०१४-१५ च्या तुलनेत २०२५-२६ या आर्थिक वर्षात अल्पसंख्याक समुदायासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत दुप्पट वाढ करण्यात आली आहे.
शिक्षण,कौशल्य विकास,रोजगारनिर्मिती,महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उन्नती यांसारख्या क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत.
अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या असून त्याचा लाभ लाखो नागरिकांना मिळत आहे, असेही सिद्दिकी यांनी नमूद केले.
"भारतीय जनता पक्षाचे सरकार अल्पसंख्याक समुदायाच्या उन्नतीसाठी समर्पित आहे आणि भविष्यातही त्यांचे सशक्तीकरण व विकास हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट राहील," असेही त्यांनी स्पष्ट केले.
