सोलापूर : बार्शी तालुका वैराग येथील धामणगाव दुमाला (दि.१९) - १२ व्या शतकातील महान समाजसुधारक संत बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त धामणगाव दुमाला येथे उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समता,मानवता आणि कर्मकांडांना विरोध हा संदेश देणाऱ्या संत बसवेश्वरांच्या विचारांचा आदर्श ठेवत गावकऱ्यांनी हा सोहळा साजरा केला.
या कार्यक्रमात दिव्यांग व मतिमंद व्यक्तींना सन्मानाने वागणूक देण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प करण्यात आले. यापुढे अशा व्यक्तींना एकेरी नावाने किंवा त्यांच्या व्यंगावरून न हाक मारता,सन्मानपूर्वक व रुबाबदार नावाने संबोधण्याचा निर्णय घेण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान मतिमंद-दिव्यांग कल्याण वाकळे (भैय्या गवळी) यांच्या हस्ते संत बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी “कल्याण” यांना “कल्याणराव” तसेच “भैय्या गवळी” यांना “भैय्यासाहेब” या सन्मानपूर्वक नावांनी संबोधण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत लेखनिक महेश भोसले यांनी दिली. तसेच गावातील सर्व दिव्यांग व मतिमंद व्यक्तींना आदरपूर्वक व सन्मानाने वागणूक दिली जाईल,असा विश्वास एमएसईबी कॉन्ट्रॅक्टर मोबीन सय्यद यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास कंटमनी पिनुभाऊ कापसे,नवनाथ भैय्या चव्हाण,केशव जगताप,जयवंत लुंगसे,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय ढेकणे,कल्याणराव वाकळे,भैय्यासाहेब गवळी, वाकळे बाई,सागर पाटील,रोहित पाटील,पो.पा.गणेश माधव मसाळ,उद्योजक अमन आतार,बाल विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
