Ticker

6/recent/ticker-posts

एनटीपीसी सोलापूरमध्ये “वृक्ष उत्पादक व खरेदीदारी मेळा २०२५-२६” यशस्वी



सोलापूर : NTPC Limited च्या सोलापूर प्रकल्पात कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने “वृक्ष उत्पादक व खरेदीदारी मेळा 2025-26” यशस्वीरित्या पार पडला. हा मेळा एनटीपीसी सोलापूरच्या आर.एल.आय. ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता.
या मेळ्याचा मुख्य उद्देश शेतकरी आणि वृक्ष उत्पादकांना अ‍ॅग्रोफॉरेस्ट्री,बांबू लागवड,वृक्षआधारित शेती तसेच मूल्यवर्धन आणि बाजारपेठेतील संधींबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन देणे हा होता.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बी.जे.सी.शास्त्री (कार्यकारी अधिकारी,एनटीपीसी सोलापूर) यांनी आपल्या भाषणात सांगितले की,वृक्षआधारित शेती ही केवळ पर्यावरण संरक्षणासाठीच नव्हे,तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठीही प्रभावी माध्यम आहे. त्यांनी याला ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी महत्त्वाची दिशा असल्याचे नमूद केले.


या कार्यक्रमाला एम.के.बेबी (मुख्य महाप्रबंधक-प्रचालन व अनुरक्षण), कन्हैया दास (अपर महाप्रबंधक-मानव संसाधन), लक्ष्मण आवारे (विभागीय वन अधिकारी) तसेच शुभांगी जावळे (सहायक वनरक्षक,सामाजिक वनीकरण, सोलापूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

मेळ्यात विविध तांत्रिक आणि व्यावसायिक घटकांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये आधुनिक वृक्षारोपण तंत्रज्ञान, टिश्यू कल्चर,कार्बन क्रेडिट संधी,मधुमक्षिका पालन,
रेशीम उत्पादन,कागद उद्योगाशी, संबंधित संधी याशिवाय कौशल्याधारित प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये सहभागी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. यशस्वी शेतकऱ्यांनी आपले अनुभव शेअर करून इतरांना प्रेरणा दिली.


हा मेळा शेतकरी आणि वृक्ष उत्पादकांसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरला. येथे त्यांना तज्ञांशी संवाद साधता आला, बाजारपेठेची मागणी समजून घेता आली आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाला अधिक चांगला दर मिळवण्यास तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित करण्यास मदत होणार आहे.
एकूणच,एनटीपीसी सोलापूरचा हा उपक्रम शाश्वत विकास, पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. संस्था भविष्यातही अशा जनकल्याणकारी उपक्रमांद्वारे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे.