Ticker

6/recent/ticker-posts

प्रभाग क्रमांक २६ मधील रत्नमंजिरी नगरातील रस्ते कामास सुरुवात...


माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या अथक प्रयत्नाला यश.

सोलापूर : प्रभाग क्रमांक २६ मधील रत्नमंजिरी नगरामध्ये गेल्या वीस वर्षापासून महानगरपालिकेकडून कुठलीच सोई सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे सदर नगरातील नागरिक हैराण झाले होते. २०१७ साली झालेल्या निवडणूक मध्ये नगरसेविका राजश्री चव्हाण ह्या निवडून आल्या होत्या त्यावेळी सदर नगरातील नागरिकांनी सदर नगरातील समस्या बाबतीत निवेदन दिले होते. त्याप्रमाणे माजी नगरसेविका चव्हाण यांच्या निधीतून सदर नगरात प्रथम पाण्याची पाईपलाईन,ड्रेनेज लाईन,दिवाबत्ती,करून देण्यात आले होते व रस्ते कामासाठी शासन दरबारी,पालकमंत्री चंद्रकांत पाटील,राधाकृष्ण विखे पाटील, व सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व दक्षिणेचे विद्यमान आमदार यांना निवेदन देण्यात आले होते व त्याबाबत सतत पाठपुरावा चालू ठेवला होता त्याला यश आले असून शासनाच्या नगरोस्थान योजनेअंतर्गत सदर रस्त्याला मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.  





सदर रस्ता झाल्यामुळे हेरिटेज फॉर्म,शिक्षक सोसायटी, गुरुदेव दत्त नगर भाग एक ते सहा,रोहिणी नगर भाग एक ते तीन,ओम गर्जना चौकातील सर्वसामान्य लोकांना व विद्यार्थ्यांना Ims कॉलेज,डी मार्ट,आसरा चौक,येथे जाणे घेण्याचे सोयीचे झाले आहे. त्यामुळे सदर नगरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडून वाहत आहे.

 
त्यावेळी सदर नगरातील नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही सदर नगरात जवळपास २० ते २५ वर्षापासून वास्तव्यास असून आम्ही शंभर टक्के सोलापूर महानगरपालिकेला टॅक्स भरत आहोत परंतु आम्हाला कुठल्याच सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे आम्हाला असंख्य त्रासाला सामोरे जावे लागत आहे.




 
तीन वर्षाखाली आमच्या नगरात मयत झाले होते - पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मयताची तिरडी ठेवण्यासाठीही जागा नव्हती सर्वत्र चिखल झाला होता ही बाब संबंधित नगरातील जाणकार नागरिक आशिष परदेशी यांनी माजी नगरसेविका चव्हाण यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ तेथे मुरूम टाकून रोलिंग करून देण्यात आले होते.
 

तरी पाठपुरावा करून शासनाकडून व पालकमंत्र्याकडून नागरिकांच्या समस्या सोडवित आहे अशा कार्यकुशल, कर्तव्यदक्ष नगरसेविका आमच्यासाठी लाभल्या हे आमचे भाग्य समजतो असे मनोगत व्यक्त केले. त्यावेळी सदर नगरातील आशिष परदेशी,प्रतीक मोसलगी,सागर साळुंखे, प्रज्वल मायनोळ,मयूर गायकवाड,दानिश सय्यद,रामचंद्र भोसले,नीलकंठ सुसलादी,अनिल मोसंलगी,सागर साळवे, अरुण गवळी,आधी उपस्थित राहून केले कामाबद्दल आभार व्यक्त केले.