Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूरचे सुपुत्र पोलिसमध्ये उपमहानिरीक्षक (DIG) पदावर पदोन्नती


सोलापूरचे सुपुत्र आयपीएस सलमानताज पाटील यांची उत्तर प्रदेश पोलिसमध्ये उपमहानिरीक्षक (DIG) पदावर पदोन्नती

सोलापूर : सोलापूरचे सुपुत्र आणि उत्तर प्रदेश कॅडरचे आयपीएस अधिकारी सलमानताज जाफरताज पाटील (IPS - २०१२ बॅच) यांची उत्तर प्रदेश पोलिसच्या उपमहानिरीक्षक (DIG) या महत्वाच्या पदावर पदोन्नती झाली आहे. यापूर्वी केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्था (CDTI), हैदराबाद च्या संचालकपदी (Director) नियुक्ती करण्यात आली होती .






सलमान ताज पाटील यांनी २ जून २०२५ रोजी हैदराबाद येथील CDTI चे संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या विविध राज्यांतील पोलीस अधिकाऱ्यांसाठी सायबर सुरक्षा, नवीन फौजदारी कायदे आणि दहशतवाद विरोधी प्रशिक्षणाचे आयोजन केले जात होते. आता त्यांची थेट उत्तर प्रदेश पोलीस राज्याच्या उपमहानिरीक्षक (DIG) पदावर नियुक्ती करण्यात आली असून सोलापूर सारख्या शहरातून त्यांना मोठ्या पदावर नियुक्त झाल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. 





सलमान ताज पाटील यांनी दुसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत यश संपादन केले होते. ते सोलापूर शहरातील पहिले मुस्लिम आयपीएस अधिकारी ठरले आहेत. तसेच सोलापूर येथील सेंट जोसेफ हायस्कूल येथे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व इंजिनरिंग झाल्यावर यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले. त्यांचे वडील जाफरताज पाटील हे मूळचे औज मंद्रुप (दक्षिण सोलापूर) येथील रहिवासी आहेत.