सोलापूर : अंधाराचा फायदा घेवुन,आडवुन दरोडा घालणाऱ्या ०८ आरोपीच्या मुसक्या आवळुन त्यांच्याकडुन. गुन्हयातील २,००,०००/- रू.व गुन्हयात वापरलेल्या ०३ मोटार सायकल असा एकुण-४,५५,०००/-रु. किमतीचा मुददेमाल जप्त करून,गुन्हा उघडकीस आणला आहे.
फिर्यादी नामे गजेंद्रसिंह बनुजी चावडा वय ४८ वर्षे,व्यवसाय नोकरी,रा.मु.पो.डडीयाल ता.विसनगरजि.मेसाना राज्य गुजरात पिन-३८४३०५ सध्या रा.प्लॅट नं.११ श्रीराम अपार्टमेंट,जुना पुना नाका,सोलापूर हे दि.०६/०१/२०२६ रोजी. मार्केटयार्ड सोलापूर येथुन त्यांचेघरी अॅक्टीवा मोटार सायकल वरुन जात असताना जुना कारंबा नाका सोलापूर येथील गतीरोधक जवळ १९.०० वा.चे सुमारास बर्गमॅन मोटार सायकल तसेच शाईन मोटार सायकल व युनिकॉर्न मोटार सायकल वरुन अनोळखी ०८ इसम फिर्यादीचे मोटार सायकल जवळ येवुन त्यांची मोटार सायकल आडवुन त्यांना लाथाबुक्याने मारहाण करुन गाडीवरुन खालीपाडुन त्यांच्या उजव्या हाताचे मनगटा जवळ चावा घेवून फिर्यादी यांच्या ऍक्टिवा मोटार सायकलच्या डिकी मधील एकुण २५,००,०००/- रू.रोख रक्कम व कागदपत्रे असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेवून पळुन गेले. म्हणुन त्यांचे विरुद्ध फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन फौजदार चावडी पोलीस ठाणे,सोलापूर शहर येथे गु.र.नं.१५/२०२६ गुन्हा दाखल होता.
नमुद गुन्हा नोंद झाल्यापासुन नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन,वरीष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राउत तसेच दुपोनिरी/दराडे यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाणेचे डी.बी.पथकाचे सपोनिरी,क्षिरसागरं व पथकाने तात्काळ तपास सुरु करुन आरोपीतांचा शोध सुरु केला तांत्रीक व इतर पुराव्यांचे आधारे तपास करुन गुप्त बातमीदार यांचेकडुन माहीती घेत असताना सदर गुप्त बातमीदार याने दिलेल्या माहीतीच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपी नामे ०१) शाहिद अब्दुलगणी शेख,वय-२७ वर्ष, रा.५७९, न्यु पाच्छापेठ अशोक चौक, सोलापूर, ०२) सोहेल हनिफ शेख,वय-२४ वर्ष, रा.घर नंबर ५१३, इंदिरा नगर, गेंट्याल चौक, सोलापूर, ०३) उमर फारूक जलाल शेख, वय २५ वर्ष, रा.न्यु पाच्छापेठ, सोलापूर ०४) मजहर युन्नुस बागलकोटे, वय २८ वर्ष, रा.घर नंबर ४३५, न्यु पाच्छापेठ, लालबहादूर हायस्कुल जवळ, सोलापूर, ०५) समीर राजअहमद सय्यद, वय-२६ वर्ष, रा.घर नंबर ४१३, न्यु पाच्छापेठ, सोलापूर, ०६) मोईन शीकत शेख, वय २६ वर्ष, रा.घर नंबर ५०९, पाथरूट चौक, न्यु पाच्छापेठ सोलापूर, ०७) जमीर रफिक शेख, वय २३ वर्ष, रा.न्यु पाच्छापेठ, सोलापूर, ०८) अल्लाबक्ष कादर सय्यद, वय-२८ वर्ष, रा.न्यु पाच्छापेठ,कैकाडी गल्ली मैदान,अशोक चौक, सोलापूर यांना लक्ष्मी मार्केट,सोलापूर येथुन शिताफीने ताब्यात घेवुन,त्यांचेकडुन गुन्हयातील रोख रक्कम २००,०००/- रोख रक्कम व गुन्हयात वापरलेल्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडुन गुन्हयातील उर्वरीत रक्कम व मुददेमाल हस्तगत करण्याची कारवाई चालु आहे. सदर आठही आरोपीतांना अटक करण्यात आले असुन त्यांची चार दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.
आरोपीच्या मुसक्या आवळुन दाखल गुन्हा उघड करून गुन्हयातील दरोडा घालुन चोरी केलेली रोख रक्कम २,००,०००/- व ०३ मोटार सायकली असा एकुण ४,५५,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडुन हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी - सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम राजकुमार साो,पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे,सहा. पोलीस आयुक्त विभाग-१, प्रताप पोमण,वपोनि महादेव राउत,दुपोनि तानाजी दराडे,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर,पोह/ पविण चुंगे,पोहवा/जगदीश हुल्ले,पोहवा/बसवराज परीट,पोहवा/सचीन बाबर,पोहवा/आयाज बागलकोटे,पोना/शिवानंद भिमदे,पोकों/कृष्णा बडुरे,पोकों/विनोदकुमार पुजारी,पोकों/विनोद व्हटकर,पोकों/अजय चव्हाण,पोकों/सुधाकर माने,पोकों/अतिश पाटील,पोकों/नितीन मोरे,पोकों/पंकज घाडगे,पोकों/अमोल खरटमल, पोकों/शशिकात दराडे,पोकों/ज्ञानेश्वर गायकवाड,पोकों/दत्ता कोळवले,पोकों/तोसीफ शेख,पोकों/सुरज सोनवलकर यांच्यासह कामगिरी करण्यात आले.
