Ticker

6/recent/ticker-posts

वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या नागरिकांनी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा...


वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या नागरिकांनी कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी त्वरित हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी

सोलापूर : मोटार वाहन कायद्यानुसार वाहन विक्री केल्यानंतर ठराविक मुदतीत त्याची मालकी बदलणे (Transfer of Ownership) कायदेशीररित्या अनिवार्य आहे. अनेकदा वाहन विकल्यानंतरही नवीन मालकाच्या नावावर हस्तांतरण केले जात नाही,ज्यामुळे जुन्या मालकावर कायदेशीर आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. 

ज‍िल्ह्यातील वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या नागरिकांनी कायदेशीर गुंतागुंत टाळण्यासाठी त्वरित मालकी हक्क हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.





हस्तांतरणाची मुदत - वाहन विक्री केल्यापासून ३० दिवसांच्या आत,आणि इतर राज्यात विक्री झाल्यास ४५ दिवसांच्या आत संबंधित आरटीओ (RTO) कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे.

हस्तांतरणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे - 
१) मूळ नोंदणी प्रमाणपत्र (RC Book/Smart Card).
२) फॉर्म क्र.२९ आणि 30 (विक्रेता आणि खरेदीदाराच्या स्वाक्षरीसह).
३) वाहनाचा वैध विमा (insurance).
४) प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC).
५) पत्ता पुरावा (उदा. खरेदीदाराचा आधार कार्ड).
६) पॅन कार्डची छायांकित प्रत,
७) इतर आवश्यक कागदपत्रे.
ऑनलाईन प्रक्रिया - आता ही प्रक्रिया 'परिवहन' (Parivahan) पोर्टलद्वारे अत्यंत सोप्या पद्धतीने ऑनलाईन करता येते.


 
वाहन विकल्यानंतर केवळ कागदावर व्यवहार न करता, आरटीओ रेकॉर्डवर देखील मालकाचे नाव बदलून घ्यावे. जर हस्तांतरणाची प्रक्रिया पुर्ण झाली नाही आणि त्या वाहनाद्वारे कोणताही अपघात किंवा गुन्हा घडला,तर त्याची सर्व जबाबदारी कायदेशीररित्या जुन्या मालकावर राहते. तसेच,ई-चलन आणि इतर दंडही जुन्या मालकाच्या नावावरच येतात. 





जुनी वाहन विकल्यानंतर ती आपल्या नावावरुन ट्रान्सफर झाल्याची खात्री होईपर्यंत निश्चित राहू नये. जुनी वाहन एक्सचेंज करताना केवळ किंमतीकडे न पाहता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत आहे का,याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सदर प्रक्रिये दरम्यान नागरिकांना काही अडचणी आल्यास 9420564513 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुनच वाहन हस्तांतरण झालेची खात्री करावी,असे पत्रकात नमूद आहे.