शिक्षणाच्या क्रांतीज्योतींचा जयघोष: मुस्लिम विकास विचार मंचतर्फे संयुक्त जयंती साजरी.
पुणे : देहूरोड येथील मुस्लिम विकास विचार मंच च्या वतीने स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व पहिल्या मुस्लिम शिक्षिका माता फातिमामाई शेख यांची संयुक्त जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम दिवगंत गोपिनाथ मुंङे चौक येथील मुस्लिम विकास विचार मंचच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवार,दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पार पडला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महा मातांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस मानवी हक्क संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी व प्रा. रामहरी वाघ यांनी,तर माता फातिमामाई शेख यांच्या प्रतिमेस दै.विशाल संविधान चे सह संपादक व भारतीय संविधान सन्मान रॅली समितीचे मुख्य समन्वयक पत्रकार अशोक कांबळे व देहूरोड शहर शिवसेना प्रमुख दिपक चौगुले यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी बोलताना के.एच.सूर्यवंशी यांनी सावित्रीमाई फुले आणि फातिमामाई शेख यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव केला. या दोन महान मातांनी अंगावर शेण-दगड झेलूनही शिक्षणाचे कार्य थांबवले नाही,त्यांच्याच कार्यामुळे आज समाजातील महिला शिक्षण अवगत करुन उच्च स्तरावर प्रगती करत आहेत,त्यांच्या विचारांचे आचरण करुन त्यांचे विचार रुजविण्याचे कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी एम.डी.चौधरी,प्रा.रामहरी वाघ,जेेष्ठ सामाजिक नेते गफूर शेख,दीपक चौगुले यांनी विचार मांडले या कार्यक्रमास पत्रकार अन्वरअली शेख,बाबू हिरमेठकर,गौस सुनार,करिम तांबोळी,हसन शेख,विश्वनाथ सरोदे,जाहिद शिकीलकर,पुणे खबर प्रतिनिधी शाहिद शेख,महंमद शेख,शफी सय्यद,घुसर गांधी,दगडू आठवले,हाजी शेख,महिबूब शेख यांच्यासह देहूरोड परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्लिम विकास विचार मंचचे अध्यक्ष रज्जाक साहेबलाल शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी गफूर शेख यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. जयंतीच्या आनंदा प्रीत्यर्थ उपस्थित नागरिकांना लाडू वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आले.
