सोलापूर : (निधन वार्ता) रामचंद्र गुंडप्पा हरसुरे यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालय येथे शनिवार,दिनांक १० जानेवारी रोजी सायंकाळी ०४ वाजता दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६० वर्षे होते. रविवार दिनांक ११ जानेवारी सकाळी १० वाजता शांती चौक हिंदू स्मशान भूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना,जावई व नातवंडे असा परिवार आहे. माकपचे युवा सामाजिक कार्यकर्ते कॉ. विजय हरसुरे यांचे ते वडील होत.
त्यांच्या निधनाने कुटुंबीय,मित्रपरिवार तसेच सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
