Ticker

6/recent/ticker-posts

तृतीयपंथीय व्यक्तींच्या तक्रारी नोंदव‍िण्याकरीता हेल्पलाईन सुव‍िधा उपलब्ध


सोलापूर : केंद्र शासनाने ट्रान्सजेंडर व्यक्ती यांच्या हक्कांचे संरक्षण कायदा २०१९ व नियम २०२० संपूर्ण देशात लागू झाले आहे. त्यानुसार तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींसाठी केंद्र शासनामार्फत स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. 




 
या पोर्टलवर तृतीयपंथीयासाठी 14427 हा नॅशनल हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे तृतीयपंथी व्यक्तींना योजनांबाबतची माहिती, अर्ज प्रक्रियेसंबंधी मार्गदर्शन,अडचणींचे निराकरण तसेच तक्रारी नोंदविण्यासाठी केंद्र शासनाची तृतीयपंथीय हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आला असून  लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,असे असे सहायक आयुक्त समाज कल्याण सुलोचना सोनवणे यांनी आवाहन केले आहे.