Ticker

6/recent/ticker-posts

मराठा सेवा संघाच्या वतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार सोहळा


सोलापूरात जिजाऊ सृष्टी आणि पुतळ्यासाठी ठोस प्रयत्नाचे अश्वासन

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून आम्ही सार्वजनिक जीवनात आलो असून समाजबांधवांच्या पाठिंब्यामुळे महापालिकेत नगरसेवक होण्याची संधी मिळाली,असे प्रतिपादन नूतन मराठा समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांनी केले. सोलापूर शहरात राजमाता जिजाऊ यांचा भव्य पुतळा उभारणे तसेच ‌‘जिजाऊ सृष्टी‌’ साकारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.




  
मराठा सेवा संघाच्या वतीने रविवार दि. २५ जानेवारी रोजी नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात उत्तर देताना नगरसेवकांनी समाजाच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार व्यक्त केला. मराठा समाजासह इतर समाजघटकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच ही यशस्वी वाटचाल शक्य झाली, असेही त्यांनी स्पष्ट केले. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहात काम करणार असल्याचे देखिल सांगितले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक सलोखा जपत काम करणार असून,राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जिजाऊ सृष्टीसारख्या प्रेरणादायी उपक्रमासाठी महापालिकेत ठोस भूमिका घेण्यात येईल,असे आश्वासन नगरसेवकांनी दिले.




 
मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रारंभी जिजाऊ वंदना घेण्यात आली त्यानंतर नूतन नगरसेवक जयकुमार माने,अमोल शिंदे,अनंत जाधव,गणेश वानकर,विनोद भोसले,प्रिदर्शन साठे,श्रीध्दा पवार,मृण्यमयी गवळी,ज्ञानेश्वरी देवकर,वैशाली भोपळे,कल्पना कदम, मनोरम सपाटे,पूनम कशिद यांचा जिजाऊ यांची प्रतिमा व बुध्द भूषणम् ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला. अमोल शिंदे, गणेश वानकर,विनोद भोसले,अनंत जाधव,जयकुमार माने,कल्पना कदम यांनी विचार व्यक्त करत सत्कारास उत्तर दिले.





कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागिय अध्यक्ष प्रशांत पाटील होते. यावेळी दत्ता मुळे,उज्वाला साळुंखे,सदाशिव पवार,आर.पी.पाटील,प्रकाश ननवरे,हणमंत पवार,नवनाथ चव्हाण,सोमनाथ राऊत,लक्ष्मण महाडिक,दिनकर देशमुख, सचिन चव्हाण गोवर्धन गुंड,प्रकाश डोंगरे,नितीन जाधव, हनुमंत चव्हाण,नितीन मोहिते,नवनाथ कदम,राम माने, परशुराम पवार,स्वाती पवार,लत्ता ढेरे,अभिजंली जाधव,प्रिति कदम उपस्थित होते.