Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन प्रकल्प येण्यासाठी नियोजन करावे...


महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन प्रकल्प येण्यासाठी नियोजन करावे : ललित गांधी

दावोस येथे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी


दावोस : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम च्या परिषदेच्या निमित्ताने दावोस (स्वित्झर्लंड) येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी दावोस येथे सहभागी झाले आहेत. जगभरातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी माहिती देण्यासाठी व आकर्षित करण्यासाठी दावस येथे भारत सरकार तर्फे उभारण्यात आलेल्या "इंडिया पॅवेलियन" व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने स्वतःची स्वतंत्र पवेलियन सुद्धा उभारले आहे. या ठिकाणी गुंतवणूकदारांना महाराष्ट्राचे सादरीकरण करण्याबरोबर गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधी व सरकारच्या सुविधा यांची माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी हे सुद्धा दावोस येथे उपस्थित आहेत. 





ललित गांधी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली व यावर्षीच्या दावस येथील दौऱ्यामध्ये विक्रमी गुंतवणूक निश्चित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन केले. आतापर्यंतच्या गुंतवणुकीचे सर्व विक्रम ओळीत काढून यावर्षी महाराष्ट्र सरकारने ३० लाख कोटी रुपयाहून अधिक गुंतवणुकीचे करार दावस येथे करून संपूर्ण जगाचे व जगातील प्रमुख उद्योग जगताचे लक्ष वेधून घेतले आहे दावस येथे विविध देशांचे पॅवेलिअन्स असून इंडिया पॅव्हेलियन मध्ये भारतातील विविध राज्यांचे कक्ष बनवण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या स्वतंत्र पेवेलीयन मध्ये सर्वाधिक गर्दी असून,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागतिक गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहेत.
१९ तारखेला "महाराष्ट्र पॅव्हेलियन" चे उद्घाटन झाल्यापासून २३ तारखेपर्यंत दावोस मध्ये सर्वाधिक गर्दी खेचणारे पॅवेलियन म्हणून महाराष्ट्र पवेलियनचा विशेष उल्लेख करावा लागेल असे ललित गांधी यांनी आवर्जून नमूद केले.  विविध सत्रांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या भविष्याची केलेली मांडणी ही दावोस मधील गुंतवणूकदारांच्या मध्ये विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. 





या नवीन येणाऱ्या गुंतवणुकीचा फायदा महाराष्ट्रातील ठराविक जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन प्रकल्प येथील अशा प्रकारे राज्य सरकारने याचे नियोजन करावे अशी मागणी ललित गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

विशेषत - पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,सोलापूर,सांगली, सातारा या चारही जिल्ह्यांमध्ये नवीन मोठे प्रकल्प येणे या जिल्ह्यांच्या विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे आग्रही प्रतिपादन ललित गांधी यांनी केले. तसेच या धर्तीवर विदर्भ, मराठवाडा,खानदेश,उत्तर महाराष्ट्र,कोकण या सर्व विभागातील छोट्या जिल्ह्यामध्ये नवीन गुंतवणुकीचे प्रकल्प येणे राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी आवश्यक असल्याचे आग्रही प्रतिपादन ललित गांधी यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून नियोजन करू अशी ग्वाही यावेळी दिली. 





याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार कौस्तुभ धावसे,उद्योग खात्याचे सचिव पी.अनबलगन,उद्योग आयुक्त दिपेंद्र कुशवाह एमआयडीसीचे सीईओ पी.वेलारासू यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी,तसेच स्वित्झरलँड मधील भारतीय उद्योजक यशोधन रामटेके,क्रीडाइ इंडियाचे संचालक हिरेन परमार आदी मान्यवर उपस्थित होते.