नांदेड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार 25 जानेवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने दुपारी 12.35 वा. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.35 वा. श्री गुरु गोबिंद सिंघजी विमानतळ,नांदेड येथे आगमन.
दुपारी 2 वा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आगमनाप्रसंगी उपस्थिती. दुपारी 2.05 वा. मोटारीने तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहिबजी नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2.15 वा.तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हुजूर साहिबजी,नांदेड येथे आगमन. दुपारी 3 वा. मोटारीने मोदी मैदान,वाघाळा नांदेडकडे प्रयाण. दुपारी 3.10 वा. मोदी मैदान वाघाळा,नांदेड येथे आगमन.
दुपारी 3.10 वा. “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 वा शहीदी एवं श्री गुरू गोबिंद सिंघजी 350 वा गुरता गद्दी शताब्दी समागम कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 4.30 वा. मोटारीने श्री गुरू गोबिंद सिंघजी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. दुपारी 4.40 वा. श्री गुरू गोबिंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. दुपारी 4.45 वा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रस्थान प्रसंगी उपस्थिती. सायं. 4.55 वा. नांदेड येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
