Ticker

6/recent/ticker-posts

कामगार नेते कुमार करजगी यांनी केली पोलीस आयुक्तांकडे तक्रार...


खंडणी मागितल्या प्रकरणी डॉ.आडके यांच्यावर चौकशीअंती कारवाईची करावी 


सोलापूर : डॉ.संदिप आडके हे संघर्ष समिती अथवा गृह निर्माण संस्थेचे अधिकृत सभासद नसताना मागील १५ वर्षे ह्या स्वार्थी मंडळींच्या चितावणीवरून माझ्या व संस्थे विरूद्ध खोटे तक्रारी करून सर्व गुंतवणूकदारांना त्रास देत आहे. त्याचबरोबर त्यांनी एक कोटी रुपयाची खंडणी मागून धमकी दिली आहे असा आरोप करत याप्रकरणी डॉ.आडके यांची चौकशी करून कारवाई करावी. याबाबतची तक्रार पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे,अशी माहिती जुनी मील संघर्ष समिती चेअरमन कुमार करजगी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 



              
आज ही मी ह्या स्वार्थी,राजकीय व बिल्डर्स मंडळीविरूद्ध संघर्ष करित आहे. डॉ.संदिप आडके हे संघर्ष समिती अथवा गृह निर्माण संस्थेचे अधिकृत सभासद नसताना मागील १५ वर्षे ह्या स्वार्थी मंडळींच्या चितावणीवरून माझ्या व संस्थे विरूद्ध खोटे तक्रारी करून सर्व गुंतवणूकदारांना त्रास देत आहे. डॉ.आडके यांनी संघर्ष समितीचे खोटी लेटर हेड व सेक्रेटरीचे खोटे शिक्के वापरून अनेकांकडून बेकायदेशीर मार्गाने लाखो रूपये कमविले आहेत. तसेच सिटी सर्व्हे ऑफिस,बिल्डर असोसिएशन,भू संपादन अधिकारी यांचेकडे समितीचे सेक्रेटरी असल्याचे भासवून खोटे पत्र व्यवहार केले आहेत. त्यामुळे मी त्यांचे विरूद्ध पोलिस खात्यामध्ये या पूर्वी तक्रार केली असताना देखील पोलिसांनी त्याचेविरूद्ध कारवाई केली नाही. त्यामुळे नाईलाजाने मी कोर्टापुढे अर्ज केले असता कोर्टाने त्याची सखोल चौकशी करून डॉ. आडके यांचेविरूद्ध फौजदारी कलम ४०६,४२०,४६९,४७१,४७२ वगैरे दाखल करून सदरबाब गंभीर असल्याची नोंद केली आहे. कोर्टाने ह्याबाबत प्रोसेस इशू करून त्यांना रूपये १५ हजारच्च्या जामिनावर सोडलेले आहे. त्यांनी माझ्या विरूद्ध पोलिसखाते,धर्मदाय खाते, इनकम टॅक्स खाते वगैरे ठिकाणी खोट्या तक्रारी केल्या आहेत,असाही आरोप करजगी यांनी तक्रार अर्जात केला आहे.




         
दि. ५ जानेवारी २०२६ रोजी मी पोलिस आयुक्त कार्यालयामध्ये हजेरी करिता गेलो असताना पोलिस आयुक्त कार्यालयात ते अचानक येवून कांगावा करू लागले की,ते करजगी यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशी तक्रार देण्यास आले आहेत. त्यावेळी त्यांना कार्यालयातून बाहेर काढले असता डॉ.संदिप आडके यांनी माझे सोबत आलेले व बाहेर उभे असलेले माझे साथीदार  सतीश रजपूत यांना सांगितले की, "मला १५ वर्षात खूप खर्च झाला आहे. कुमार करजगी ह्यांच्या विरूद्ध मी सर्व तक्रारी एकाच अटीवर मागे घेईन. कुमार करजगी यांना रेल्वेकडून करोडो रूपये नुकसान भरपाई मिळणार आहे व ते मला माहित आहे," जर त्यांनी मला रूपये १ कोटी रोख स्वरूपात ताबडतोब दिले पाहिजे. "जर कुमार करजगी यांनी ही रक्कम ताबडतोब मला दिली नाही तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील." असा दम दिला असल्याचा आरोप कुमार करजगी यांनी यावेळी केला.




          
अनेक संस्था व गुंतवणूकदारांकडून गैर मार्गाने पैसा उकळत आहे व मला ही त्यांनी बेकायदेशीर खंडणी मागीतली आहे, असा आरोप करत याप्रकरणी डॉ.संदिप आडके यांची  पोलीस प्रशासनाने कायदेशीर सखोल चौकशी करावी,अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे केली असल्याचेही करजगी यांनी स्पष्ट केले.