Ticker

6/recent/ticker-posts

मनपाच्या कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांना दंड....


मनपाच्या कामचुकार २४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना ४१ हजारांचा दंड

महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केली कारवाई

सोलापूर : महापालिकेच्या  पोर्टल / माय सोलापूर ॲपवरील नागरी तक्रारींचे वेळेत निपटारा न करणाऱ्या अतिक्रमण प्रतिबंधक विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यासह महापालिकेच्या २४ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या सर्वांना मिळून एकूण ४१ हजार ८०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी कारवाईचे आदेश काढले आहेत. 





          
शहरातील नागरीकांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीकोनातून ऑनलाईन तक्रार करण्याची सोय महापालिकेने पोर्टल / माय सोलापूर ॲपवर  उपलब्ध करून देण्यात आली आहे.या तकारीचे निराकरण संबंधित विभागाच्या अधिकारी / कर्मचारी यांच्या कडून मुदतीत पूर्ण करून, केलेल्या कार्यवाहीबाबतची माहिती संबंधित पोर्टल व ॲपवर अद्ययावत करण्याचे निर्देश सर्व अधिकारी कर्मचारी यांना वेळोवेळी देण्यात आले आहेत. तक्रारीचा निपटारा मुदतीत न करणाऱ्या अधिकारी /  कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी याआधीच परिपत्रकाद्वारे दिले होते. 




        
या अनुषंगाने तक्रारीचा निपटारा मुदतीत न करणाऱ्या २४ अधिकारी /  कर्मचाऱ्यांना एकूण ४१ हजार ८०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे.दंडाची रक्कम जानेवारी २०२६ पेड इन फेब्रुवारी - २०२६ च्या मासिक वेतनातून एकरकमी वसूल करण्यात यावी,असे आदेश महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिले आहेत.





कर्मचारी नाव कंसात कार्यालय आणि 
दंड रक्कम याप्रमाणे - अजिंक्य साळुंके - (विभागीय कार्यालय क्र. ०१ - ५०० रुपये),  प्रशिक बडोळे - (विभागीय कार्यालय क्र. ०५ - २५०० रुपये)
श्रीमाला गायकवाड - (विभागीय कार्यालय क्र. ०८ - १००),
दिपाली मेटकरी - (नगर रचना कार्यालय - ४०००)
 अॅड. अजिंक्य विपत - (विभागीय कार्यालय क्र. ०६ - १००), राहुल कांबळे - (विभागीय कार्यालय क्र. ०७ - ३९००), श्रीनिवास लिंगराज - (कर आकारणी विभाग - ३००), शिवाजी नलवडे - (विभागीय कार्यालय क्र. ०७ - ९००), महेश कासराळे - (गव.सु.तांत्रिक विभाग - १५००),
 सोमाजी साबळे - (धनकचरा व्यवस्थापन विभाग - ३३००)
 बसवराज जामदार - (धनकचरा व्यवस्थापन विभाग - २००), पंकज क्षीरसागर - (धनकचरा व्यवस्थापन विभाग - १००), प्रकाश नरळे - (धनकचरा व्यवस्थापन विभाग - १५००), विजय साळुंखे - (धनकचरा व्यवस्थापन विभाग - ६०००),  विठोबा शिंदिबंदी - (धनकचरा व्यवस्थापन विभाग - १००), अक्षय हूलसुरे- (धनकचरा व्यवस्थापन विभाग - ३६००), अनिकेत कांबळे - (विभागीय कार्यालय क्र. ०३ - ३००), संजय कोळी - (विभागीय कार्यालय क्र. ०४ - १००), आकाश पाटील - (विभागीय कार्यालय क्र. ०१ - १९००), अनिकेत कावळे - (विभागीय कार्यालय क्र. ०२- १००),
हर्षाली जाधव - (विभागीय कार्यालय क्र. ०३ - १००), कुलदीप जगदाळे - (विभागीय कार्यालय क्र. ०६ - ६००), सुकुर अत्तार - (कर आकारणी विभाग - ६०००), जगन्नाथ बनसोडे - (अतिक्रमण विभाग - ६३०० रुपये).