सोलापूर : प्रभाग क्रमांक २६ मधील हेरिटेज फॉर्म,ज्योती नगर, बँक कॉलनी,बंडापा नगर,कोरे वस्ती,उद्धव नगर भाग एक व दोन,अमर नगर सोरेगाव, स्वस्तिक नगर, शितल नगर,रजनीश रेसिडेन्सी,आदित्य रेसिडेन्सी,आर्यश रेसिडेन्सी. या नगरात माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नातून पाठपुरावा केल्यामुळे ड्रेनेज लाईन पूर्णत्वास झाली असून तेथे पाण्याची पाईपलाईन नसल्याबाबत संबंधित नगरातील नागरिकांनी माजी नगरसेविका चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना सदर नगरामध्ये पाण्याची पाईपलाईन नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत असले बाबत सांगितल्यानंतर तातडीने सदर नगरात पिण्याचे पाणी पाईपलाईन साठी निवेदन सादर करावे असे पालकमंत्री गोरे व सोलापूर महानगरपालिका आयुक्त ओंबासे यांनी नगरसेविका माजी चव्हाण यांना सांगितल्यानंतर तातडीने निवेदन देण्यात आले आहे त्यामुळे नगरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
नगरातील पाण्याच्या पाईपलाईन समस्या बाबत पाठपुरावा केल्याबद्दल वरील नगरातील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की नगरसेवक असावा तर नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा सारखा असावा विशेष म्हणजे त्यांचा नगरसेवकाच्या कार्यकाल संपलेला असताना सुद्धा जातीने मनावर घेऊन पाठपुरावा करून नागरिकाच्या समस्या सोडवीत आहेत अशा कर्तव्यदक्ष, अभ्यासू,जनतेच्या हाकेला धावून येणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो भविष्यात त्यांच्या पाठीमागे आम्ही सदैव पाठीशी राहू असे मनोगत व्यक्त केले.
