सोलापूर : संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी व विद्युत विभाग अभियंता यांना स्मार्ट मीटर अतिरिक्त वाढीव बिलाविरोधात निवेदन देण्यात आले व निदर्शने करून स्मार्ट मीटरचा व अदानीचा जाहीर निषेध करण्यात आला. अदानी समूह कंपनी मार्फत वीज ग्राहकांना नवीन टीओडी मीटर म्हणजेच स्मार्ट मीटर बसवण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रात दिले आहे हे मीटर बसवण्यासाठी कंपनीच्या लोकांकडून सक्ती केली जात आहे. ग्राहक घरी नसताना त्यांचे बाहेरील भिंतीवरचे मीटर परस्पर त्यांच्या परवानगी शिवाय बदलले जात आहेत. कधी कधी तर कंपनीची लोकं ग्राहकांची फसवणूक करीत आहेत असे सांगून की इथून पुढे तुमच्या घरी मीटर रीडिंग साठी लाईट ऑफिसचे कर्मचारी येणार नाहीत व हे स्मार्ट मीटर कंपल्सरी बसवणे बंधनकारक आहे. असे काहीही सांगून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. हे मीटर बसवल्यावरती ग्राहकांना जवळपास दुपटी ते तिपटीने बिल वाढवून येत आहे. या मीटरच्या वाढीव बिला संदर्भात नागरिक लाईट ऑफिसला गेले असता तिथल्या अधिकारी त्यांची दखल घेत नाहीत उत्तरे देण्या स्टार्टर करतात व दमदाटी केली जाते अशा आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत.
सोलापूर शहर हे यंत्रमाग कामगारांचे शहर आहे या शहरांमध्ये आधीच रोजगारांची कमी आहे. रोज काम केले तर कुठे महिन्याला पाच दहा हजार रुपये पगार मिळतो आणि यातच जर वीज बिलासाठीच महिन्याला चार ते पाच हजार रुपये भरावे लागत असतील तर नागरिकांनी त्यांची उपजीविका कशी भागवायची आणि खायचं प्यायचं काय असा गंभीर प्रश्न नागरिकांपुढे पडलेला आहे. त्यासाठी पूर्वीचे मीटर बदलून नवीन मीटर बसवले आहेत ते काढून तत्काळ जुने मीटर बसवून द्यावेत व ग्राहकांना स्मार्ट मीटरच्या माध्यमातून दुपटी-तीपटीने जे वीज बिल आकारण्यात आले आहेत त्यांचे बिल त्वरित कमी करावे व नागरिकांना मीटर बदलण्यासाठी जबरदस्ती करू नये. अन्यथा असे जर झाले नाही तर संभाजी ब्रिगेड च्या वतीने स्मार्ट मीटर जिथे जिथे बसवले आहेत ते फोडून संपूर्ण महाराष्ट्रभरात तीव्र अशा स्वरूपाचे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आले.
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले,महानगर प्रमुख जगदाळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मीनलदास, वकील आघाडीचे जिल्हाप्रमुख गणेश कदम, महिला आघाडी शहराध्यक्ष मनीषा कोळी,सुनीता घंटे,जिल्हा उपाध्यक्ष,राजेंद्र माने, जिल्हा सचिव,शेखर भोसले,जिल्हा कार्याध्यक्ष,सिद्धाराम सावळे शहर व जिल्हा सचिव,सतीश वावरे शहर कार्याध्यक्ष, जरयाब आबादिराजे,साहिल बागवान,अस्लम शेख, मुरतुज शेख,इस्माईल शेख,गऊस शेख,शफिक मकाशे व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
